पुणे :
हिंदुत्ववादी विचारांच्या भाजप आणि शिवसेना या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये सध्या विळ्या-भोपळ्याचे सख्य आहे. त्यामुळेच भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी पुन्हा एकदा शिवेसेनेला याच मुद्य्यावर टोला मारला आहे. त्यावर त्यांना आता प्रत्युत्तर मिळण्यास सुरुवात झालेली आहे.
भातखळकर यांनी म्हटले आहे की, मोदी सरकार लवकरच सतीश धवन उपग्रहातून श्रीमद भगवद्गीतेची प्रत अंतरिक्षात पाठवणार आहे. हिंदुत्व हा पोपटपंची चा विषय नाही. हिंदुत्व जगायचे असते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हिंदुत्व जगतायत. फार कमी जणांना झेपते हे.
त्यावर श्रीमान नागवेकर यांनी लिहिले आहे की, श्रीमद् भगवद्गीता अंतरिक्षात पाठवली म्हणजे हिंदुत्व जगतायत? गीतेची प्रत अंतरिक्षात पाठवणं आणि हिंदुत्व याचा काय संबंध? अंतरिक्षात वाचणार कोण? शिवसेना नगरसेवकाने केलेलं कार्य आपल्या नावावर खपवणं हे कोणतं हिंदुत्व?
पराग मोहिते यांनी म्हटलेय की, खुळेपणा असावा.. पण इतका??? अरे !!! दाखवण्यात काहीतरी कमी ठेवा… अंतराळात भगवद्गीता पाठवून साध्य काय होणार नमुन्यानो.. कोण बसलय तिथे ती वाचायला??? ह्याला हिंदुत्व नाही मंदत्व म्हणतात… त्यापेक्षा प्रत्येक हिंदू कुटुंबातील लहानग्याना १ भगवद्गीता वाटायची.. ते तरी पटल असत..
निलेश बिडकर लिहितात की, बुलेट ट्रेन, गटारातून गॅस आता अंतराळात श्रीमदभगवतगीता यापेक्षा सर्व सामान्यांचे रस्ते ठीक करा संसद भवन ते पंतप्रधान निवास हा रस्ता चकाचक असणे म्हणजे देशातील सगळे रस्ते चकाचक होत नाहीत.
जयेश वाणी म्हणालेत की, अशिक्षीत माणसं सत्तेत आलीत की हेच होणार. भगवतगीता अंतराळात गेली तर जास्त ग्रेट आणि नाही गेली तर कमी ग्रेट होणारंय का? गीता आत्म्याचं अमरत्व मानते शरीलाला फक्त वस्त्र. तुम्ही वस्त्रावरुन धर्मांधता जोपासता. गीता अंतराळात नाही अंतरंगात जपुन ठेवा. तो खरा सन्मान बाकी तुमचं ढोंगच.
मयूर जाधव यांनी म्हटलेय की, तसेही अंतरिक्षावरील तुमचे प्रेम सर्वश्रुत आहे सर! दिवे लावलेले भारताचे चित्र उपग्रहाने टिपण्या इतक्या मोठ्या अफवा पसरवणे साधे काम आहे का? फार कमी जणांना झेपते हे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट