भगवद्गीतेची प्रत थेट अंतराळात; मोदी सरकारने घेतला मोठा पुढाकार, सेनेला हाणला टोला..!
मुंबई :
हिंदुत्ववादी विचारधारा जगभरात नव्हे तर थेट अवघ्या विश्वामध्ये फोफावण्यासाठी केंद्रातील सत्ताधारी भारतीय जनता पार्टीचे सरकार प्रयत्नशील आहे. त्यासाठीचा आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने थेट अंतराळात भगवद्गीतेची प्रत पाठवून देण्याचा महत्वाकांक्षी निर्णय घेतला आहे.
कांदिवली इस्ट येथील भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी याची पोस्ट शेअर केली आहे. हिंदुस्तान टाईम्स या इंग्रजी वृत्तपत्राच्या बातमीची लिंक भातखळकर यांनी शेअर केली आहे.
त्यात भातखळकर यांनी लिहिले आहे की, मोदी सरकार लवकरच सतीश धवन उपग्रहातून श्रीमद भगवद्गीतेची प्रत अंतरिक्षात पाठवणार आहे. हिंदुत्व हा पोपटपंची चा विषय नाही. हिंदुत्व जगायचे असते. पंतप्रधान मोदी ते जगतायेत. फार कमी जणांना झेपते हे.
अखेरची ओळ टाकून त्यांनी याप्रकरणी महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना पक्षाला टोला लगावला आहे. एकूणच श्रीमद भगवद्गीतेची प्रत थेट अवकाशात पाठवण्याची ही भाजपची योजना आहे.
त्यावर अनेकांनी उलटसुलट प्रतिक्रिया दिलेल्या आहेत. आता यावर शिवसेना कोणती भूमिका मांडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य