करोना विषाणूने जगभरात इम्युनिटी पॉवर आणि आरोग्यदायी जीवनपद्धती यांचे महत्व खऱ्या अर्थाने अधोरेखित झाले आहे. अशावेळी आता डायट, इम्युनिटी बुस्टर, न्युट्रास्यूटीकल, आयुर्वेदिक औषधे आणि चांगले खाद्य यावर सर्वांचा फोकस आहे.
त्यामुळेच आज आपण पाहणार आहोत की, महिलांनी स्वयंपाक घरात आपल्या कुटुंबाचे आरोग्य रक्षण आणि काळजी घेण्यासाठी आयुर्वेदिक डायट कशा पद्धतीने तयार करावा आणि सर्व्ह करावा.
मित्रांनो आणि मुख्य म्हणजे मैत्रिणींनो, आहार हा आपल्या आरोग्याचा महत्वाचा घटक आहे. रोग न होऊ देण्यासाठी आहार जीवनसत्वयुक्त उत्तम आणि पोषक घटकांनी युक्त असावा. त्यासाठी आयुर्वेदिक आहार हा एक चांगला विकल्प आहे.
अशा आहारात असणारे घटक असे :
- प्रथिने या घटकासाठी : चिकन, अंडे (पांढरे), टोफू, दूध, तूप, लोणी
- फळे : संत्री, नाशपाती, अननस, केळी, खरबूज, आंबे यासह सर्व प्रकारची फळे
- भाजीपाला : कोबी, फुलकोबी, कोशिंबीर, काकडी, पालेभाज्या, रताळे, गाजर, यासह सर्व भाज्या
- इतर घटक : नारळ, काळी मिरी, जिरे, दालचिनी, सीताफळ, हळद, उपयुक्त मसाले
आयुर्वेदिक आहाराचे फायदे असे :
- हा आहार फायबर, जीवनसत्त्वे आणि खनिजे समृद्ध असतो.
- हे खाल्ल्याने हृदयरोग, कर्करोग, मानसिक तणाव, रक्तदाब, यकृत आणि मूत्रपिंडाच्या समस्यांपासून दूर राहण्यास मदत करते.
- हे वजन कमी करण्यास देखील मदत करते. नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार, जर आपण 3 ते 9 महिन्यांपर्यंत संपूर्ण मार्गदर्शक सूचनांसह आयुर्वेदिक आहार घेत असाल तर वजन 6 किलो पर्यंत कमी केले जाऊ शकते.
- असा समतोल आहार ताणतणाव, चिंता आणि मानसिक समस्यांना प्रतिबंधित करतो.
- कार्यक्षमता वाढल्याने आपल्या जीवनात उन्नती होण्याची संधी वाढते.
संपादन : माधुरी सचिन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट