Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ पद्धतीने होणार ‘रेल रोको’; पहा काय अनोखे नियोजन केलेय शेतकरी आंदोलकांनी

दिल्ली :

Advertisement

82 दिवस चालू असलेले शेतकरी आंदोलन आता हिवाळा ऋतू सोडून उन्हाळ्याच्या तयारीसाठी लागलेले आहे. दरम्यान, 18 फेब्रुवारी रोजी देशभरात शेतकरी आंदोलक रेल्वे रोको करणार आहेत. त्यासाठी शेतकऱ्यांनी करायचे टास्क आणि कृती यांची माहिती प्रसिद्ध झालेली आहे.

Advertisement

रेल्वे रोको आंदोलनासाठी रणनीती जाहीर झाली आहे. भारतीय किसान युनियनचे प्रदेशाध्यक्ष राजबीरसिंग जादौन म्हणाले की, शेतकरी नेते सर छोटूराम यांची जयंती साजरी केली जाईल. यासाठी राज्य व मंडल व जिल्हा पातळीवरील शेतकर्‍यांना संदेश देण्यात आला आहे. त्याचवेळी रेल्वे रोको आंदोलनात शेतकरी आपल्यासोबत पुष्पहार घेउन सहभागी होतील.

Advertisement

रेल्वे ही राष्ट्राची मालमत्ता असल्याने प्रथम रेल्वे इंजिनवर फुलांचा हार घालण्यात येईल. तसेच शेतकरी आंदोलक आपल्याबरोबर पाणी, चहा आणि इतर प्रकारच्या खाद्यपदार्थ घेऊन असतील. चळवळीमुळे रेल्वेमध्ये बसलेला कोणताही प्रवासी अडचणीत येऊ नये याची दक्षता घेतली जाईल, असे त्यांनी सांगितले आहे.

Advertisement

तसेच रेल्वेतील मुले, स्त्रिया, वृद्धांना अन्न पुरवले जाईल असे सांगताना भाकीयूचे उपाध्यक्ष राजबीर सिंह म्हणाले की, बैठकीत रेल्वे रोको आंदोलन, शेतकर्‍यांची संख्या आणि इतर प्रकारच्या रणनीती ठरवल्या जातील. त्याबाबत सांगितले जाईल.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply