Take a fresh look at your lifestyle.

म्हणून शेतकरी आंदोलक लागले तयारीला; वीज कनेक्शनसाठी दिलेत अर्जही..!

दिल्ली :

Advertisement

दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकरी चळवळीने आता उन्हाळ्याची तयारी केली आहे. कुलर बसवण्याच्या उद्देशाने विद्युत यंत्रणेसाठी म्हणून तात्पुरत्या कनेक्शनसाठी महामंडळाकडे अर्ज केले जात आहेत. तसेच वीज महामंडळाने कनेक्शन दिले नाही तर आंदोलनाच्या ठिकाणी जनरेटरची व्यवस्था करण्याचीही तयारी केलेली आहे.

Advertisement

यूपी गेटवर 82 दिवसांपासून आंदोलन चालू आहे. शेतकर्‍यांनी हिवाळ्याच्या थंडीवर मात करून आपले आंदोलन चालू ठेवलेले आहे. मात्र, आता उन्हाळा सुरू झाला आहे. उन्हाचा कडका टाळण्यासाठी शेतकऱ्यांना चळवळीच्या ठिकाणी गरजेनुसार कूलर दिले जाणार आहेत.

Advertisement

त्यासाठी शेतकऱ्यांनी कूलर ऑर्डर करण्यास सुरुवात केली आहे. यासाठी विद्युत कॉर्पोरेशनला चळवळीच्या ठिकाणी 100 किलोवॅटचे तात्पुरते कनेक्शन देण्यासाठी पत्र दिले जाईल. कनेक्शन घेण्यास लागणारा खर्च आणि वीजबिल किसान समितीद्वारे दिले जाईल.

Advertisement

वीज महामंडळाकडून कनेक्शन दिले गेले नाही तर शेतकर्‍यांच्या वतीने आंदोलनस्थळी जनरेटरची व्यवस्था केली जाईल. उष्णता वाढत असल्याचे सांगत राकेश टिकैत म्हणाले की, उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. वीज कनेक्शनसाठी विद्युत महामंडळाकडे अर्ज केले जातील. कनेक्शन न मिळाल्यास जनरेटरची व्यवस्था केली जाईल.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply