Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक : संसदेच्या परिसरात महिला खासदारावरच अत्याचार; पंतप्रधानांनी मागितली माफी..!

दिल्ली :

Advertisement

ऑस्ट्रेलियाच्या संसदेत एका महिलेवर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली असून त्यानंतर पंतप्रधान स्कॉट मॉरिसन यांनी त्या महिलेची माफी मागितली आहे. त्यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. संसद संकुलामध्येच तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप या महिलेने केला आहे.

Advertisement

मॉरिसन यांचे म्हणणे आहे की, या प्रकरणानंतर देशातील कार्यसंस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. त्यामुळे याची चौकशी केली जाईल. या महिलेचे म्हणणे आहे की मार्च 2019 मध्ये संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्ड्सच्या कार्यालयात तिच्यावर बलात्कार करण्यात आला होता.

Advertisement

आरोपी हा मॉरिसनच्या सत्ताधारी लिबरल पार्टीशीही संबंधित असल्याचेही या महिलेचे म्हणणे आहे. या महिलेने सांगितले की, तिने एप्रिल 2019 मध्ये पोलिसांना याबाबत कळवले होते. पण त्यावेळी तिने पुढे काहीही केले नाही. मात्र, आता तिने आपल्या करिअरचा धोका पत्करल्यानंतर औपचारिक तक्रार करण्याचे ठरविले आहे.

Advertisement

या महिलेचे म्हणणे असे आहे की, तिने याबद्दल रेनॉल्ड्स कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही सांगितले होते. परंतु, त्यानंतरही तिला त्याच कार्यालयातील बैठकीस उपस्थित राहण्यास सांगितले गेले. सोमवारी संरक्षणमंत्री लिंडा रेनॉल्ड्स म्हणाले की, महिलेने तिच्यावर झालेल्या बलात्काराची माहिती दिली होती.

Advertisement

तथापि, महिलेवर औपचारिक तक्रार न करण्यासाठी दबाव आणल्याचे त्यांनी नाकारले आहे. आता मंगळवारी स्कॉट मॉरिसनने त्या महिलेची माफी मागितली असून या संपूर्ण प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply