Take a fresh look at your lifestyle.

शिवसेनेत फुट मात्र ‘या’ काँग्रेस मंत्र्यांनी केली राठोडांची पाठराखण; भाजप नेत्यांची महिलांबाबतची डझनभर प्रकरणं सांगेन

पुणे :

Advertisement

राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. या मुलीच्या मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लाभलं आहे. या मृत्यूप्रकरणाला राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे.

Advertisement

या प्रकरणावरुन शिवसेनेत फुट पडली असली तरी एका बड्या काँग्रेस मंत्र्याने राठोडांची पाठराखण केली आहे. राज्याचे मंत्री व काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी या प्रकरणावर परखड आणि स्पष्ट भाष्य केले आहे.

Advertisement

संजय राठोड यांचा राजीनामा ही मीडिया ट्रायलची परिणती आहे.  भाजप नेत्यांची महिलांबाबतीच डझनभर प्रकरणे मला सांगता येतील. पण भाजप नेत्यांसाठी नैतिकता लागू पडत नाही, तिथे नैतिकता संपुष्टात येते, अशी टीका वडेट्टीवार यांनी केली आहे.   

Advertisement

पुढे बोलताना ते म्हणाले की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणाबाबत स्पष्ट भूमिका घेऊन योग्य केले. लवकरच याप्रकरणातील सत्य बाहेर येईल.

Advertisement

संजय राठोड यांच्या राजीनाम्यावरुन शिवसेनेत दोन गट पडल्याची चर्चा आहे. राठोड यांनी राजीनामा देऊ नये, असे सेनेतील एका गटाचे म्हणणे आहे. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply