Take a fresh look at your lifestyle.

मार्चनंतर कांद्याला बसणार फटका; वाचा, कसा होणार दरावर परिणाम

पुणे :

Advertisement

सध्या कांद्याच्या दरात वाढ झालेली आहे. अगदी ठोक बाजारातही कांद्याने भाव खाल्ला आहे. आता कांद्याचे भाव अजून वाढण्याची शक्यता सांगितली जात होती. मात्र आता येत्या पंधरा दिवसात नवीन कांदा मार्केटमध्ये दाखल होणार असल्याने कांद्याचे दर वाढण्याची शक्यता तूर्तास तरी कमीच आहे.

Advertisement

राज्यात कांदा तुटवडा कायम असून आवश्‍यकतेपेक्षा कमी आवक बाजार समित्यांमध्ये होत आहे. बाजारात कांदा 45 ते 55 रुपये किलो दराने विकला जात आहे. गेल्या काही दिवसांतच कांदा दर दुप्पट झाले आहेत. यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

Advertisement

सध्या हवामान ठीक आहे. त्यामुळे अशा हवामानात कांद्यांचं चांगलं उत्पादन मिळेल. रब्बी हंगामातील कांदा बाजारात येणार असून भावही कमी होतील, असा अंदाज तज्ञांनी सांगितला आहे. जानेवारीत 25 ते 30 रुपये किलो दराने कांदा मिळत होता.

Advertisement

फेब्रुवारीच्या पहिला आठवड्यानंतर कांदा ठिकठिकाणी 50 ते 60 रुपये प्रतिकिलो दराने विकला जात आहे. कांदा आणखी काही काळ सर्वसामान्य ग्राहकांना रडवणार आहे. आता मार्चनंतर कांद्याचे दर कमी होण्याची शक्‍यता आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply