Take a fresh look at your lifestyle.

सत्यजित तांबेंनी जयंत पाटलांना दिल्या ‘त्या’ शुभेच्छा; त्यावर म्हटले गेले ‘असेही’..!

अहमदनगर :

Advertisement

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांना अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. मात्र, त्यात सर्वाधिक चलती आहे ती युवक कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांच्या शुभेच्छांची.

Advertisement

कारण, तांबे यांनी मंत्री पाटील यांच्या नेमक्या भावनेला आणि स्वप्नांना हात घालणाऱ्या शुभेच्छा दिल्या आहेत. नुकतेच काही दिवसांपूर्वी आपल्यालाही राज्याचे मुख्यमंत्री होण्याची इच्छा असल्याचे जयंत पाटील यांनी म्हटले होते. नंतर, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या समर्थकांनी व त्याद्वारे पक्षात थोडीफार खळबळ होण्याच्या शक्यतेने नंतर पाटील यांनी शब्द फिरवले.

Advertisement

Satyajeet Tambe on Twitter: “काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! एक दिवस आपण ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा. @Jayant_R_Patil https://t.co/uLMyh34beU” / Twitter

Advertisement

पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही यावर खेळीमेळीने उत्तर दिले होते. मात्र, त्यामुळे जयंत पाटील यांना महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री होण्यात इंटरेस्ट असल्याचे जगजाहीर झालेले आहे. तोच धागा पकडून तांबे यांनी पाटील यांना शुभेच्छा दिलेल्या आहे.

Advertisement

‘काका, वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ! एक दिवस आपण ह्या महाराष्ट्राचे नेतृत्व करावं ह्याच सदिच्छा’, असे लिहिताना तांबे यांनी जयंत पाटील यांच्यासह असलेला एक पुढे चालतानाचा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे.

Advertisement

त्यावर सौरभ शिंदे पाटील यांनी म्हटले आहे की, प्रत्येक वेळेस त्यांनी करावं का नेतृत्व ? आपल्या जिल्ह्याला कधी संधी मिळणार ? असं पण नाही की आपल्याकडे तसं नेतृत्व नाही… कॉंग्रेसकडे मामा महसूलमंत्री बाबासाहेब थोरात आहेत ना ? का तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसच्या आहारी जाताय ?

Advertisement

सचिन साबणे यांनी म्हटलेय की, अजितदादा ट्विट बघतील तांबे साहेब. तर, विवेक वडोकर यांनी म्हटले आहे की, तुमची आम्हाला साथ असो ताम्बे साहेब.

Advertisement

एकूणच अनेकांना तांबे यांचा म्हणण्याचा नेमका भावार्थ समजला आहे. त्यामुळेच आता अनेकांनी यावर व्यक्त होण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply