तपासाच्या सिलसिल्यात पुणे पोलिस यवतमाळमध्ये; ‘त्यांचा’ घेतला जबाब, वाचा पुजा चव्हाणचे यवतमाळ कनेक्शन
मुंबई :
महाराष्ट्राचे राजकीय वर्तुळ सध्या अशा घटनांनी हादरले आहे, ज्या खरोखरच अत्यंत धक्कादायक आहेत. आधी मुंडे आणि आता राठोड प्रकरणामुळे महाविकास आघाडी सरकार वेगळ्या दिशेने चर्चेत आले आहे. भाजप नेत्यांना तर ही टीका करण्याची आयती संधी मिळाली आहे.
राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या चर्चेत असलेल्या पूजा चव्हाण प्रकरणाचे धागेदोरे थेट यवतमाळ पर्यंत असण्याची शक्यता आहे. या मृत्यूप्रकरणाला राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव जोडले जात आहे.
आताच आता टीव्ही9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. दरम्यान पुणे पोलिस मध्यरात्री थेट यवतमाळमध्ये पोहोचल्याचे समोर आले आहे.
पुणे पोलिसांनी वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे यांचा जबाब नोंदविला आहे. तसेच मध्यरात्री एचएमआयएस कक्षाची तपासणी केली आहे. पूजा चव्हाण हिच्यावर यवतमाळमध्ये उपचार केले गेल्याचा संशय आहे.
पूजा चव्हाण हिने महाविद्यालयातील स्त्रीरोग विभागात उपचार घेतले होते काय याची माहिती लेखी स्वरुपात करण्यात आली आहे. पूजाचा मृत्यु झाल्यावर मध्यरात्री नंतर एचएमआयएस कक्ष उघडण्यात आला होता. इतक्या रात्री हा कक्ष उघडण्यामागील रहस्य गुलदस्तात आहे. या ठिकाणी काही धागेदोरे मिळतात का याचाही पुणे पोलिसांचे पथक तपास करीत आहेत.
मात्र अद्यापही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्य समोर आल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाच्या काही ऑडिओ क्लिप्स सध्या व्हायरल होत आहे.
प्रकरणात ऑडिओ क्लीप हे महत्त्वपूर्ण पुरावे मानले जात आहे. या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट