Take a fresh look at your lifestyle.

पुजा चव्हाण प्रकरणातील सर्वात मोठी बातमी… संजय राठोडांची राजीनाम्याविषयी भूमिका अखेर स्पष्ट; वाचा, त्यांची भूमिका आणि राजकारण

मुंबई :

Advertisement

राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. या मुलीच्या मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लाभलं आहे. या मृत्यूप्रकरणाला  राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे.

Advertisement

दरम्यान गेल्या काही दिवसांपासून माध्यमांना बगल देणार्‍या मंत्री संजय राठोड यांनी अखेर माध्यमांना सामोरे जाणार असल्याचे समजत आहे. अशातच सकाळच्या सुमारास राठोड हे राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली होती.

Advertisement

आता टीव्ही9 या वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तानुसार, राठोड यांनी अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. संजय राठोड यांनी मातोश्रीवर आपला राजीनामा पाठवला आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हा राजीनामा स्वीकारणार की नाकारणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

Advertisement

भाजपने आक्रमकपणे राठोड यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. एवढेच नाही तर भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती.

Advertisement

मात्र अद्यापही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्य समोर आल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नसल्याचे सांगितले आहे. या प्रकरणाच्या काही ऑडिओ क्लिप्स सध्या व्हायरल होत आहे.

Advertisement

प्रकरणात ऑडिओ क्लीप हे महत्त्वपूर्ण पुरावे मानले जात आहे.  या क्लीप नेमक्या कशा बाहेर आल्या याबाबत विचारणा केली जात आहे. ज्या दिवशी ही घटना घडली त्यावेळीच भाजपच्या एका स्थानिक कार्यकर्त्याने अरूण राठोडकडून या ऑडिओ क्लीप काढून घेतल्याचं समोर येत आहे. तसेच त्याचवेळी त्यांच्या फोटो आयडीचे फोटो काढून घेतल्याचं सांगितलं जात आहे.      

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply