मुंबई :
राज्याच्या राजकीय आणि सामाजिक पटलावर सध्या पूजा चव्हाण प्रकरण चर्चेत आहे. या मुलीच्या मृत्यूप्रकरणाला राजकीय वळण लाभलं आहे. या मृत्यूप्रकरणाला राज्याचे वनमंत्री आणि शिवसेना नेते संजय राठोड यांचे नाव घेतले जात आहे.
यावरुन राज्याच्या राजकाणातही खळबळ माजली आहे. पूजा चव्हाणच्या आत्महत्येनंतर अनेक ऑडिओ क्लिप सोशल मीडियामध्ये व्हायरल होत आहेत. ज्यात संजय राठोड आणि पुजाच्या रूममेटचा संवाद असल्याचे म्हटले जात आहे.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून माध्यमांना बगल देणार्या मंत्री संजय राठोड यांनी अखेर माध्यमांना सामोरे जाणार असल्याचे समजत आहे. अशातच राठोड हे राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
राठोड यांच्यावरुण शिवसेनेत फुट पडली आहे. यापैकी एक गट नैतिकता जपण्यासाठी संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा, अशा मताचा आहे. तर दुसरा गट संजय राठोड यांच्यावर कुठलीही कारवाई होऊ नये, असे म्हणत आहे.
मात्र अद्यापही महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सत्य समोर आल्याशिवाय कोणतीही कारवाई होणार नसल्याचे सांगितले आहे. असे असले तरी शिवसेनेत पडलेल्या फूटीनंतर मुख्यमंत्री आणि शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे.
पुजाच्या आत्महत्येपासून मंत्री संजय राठोड हे मुंबईत होते. अनेकांनी मंत्री संजय राठोड यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.
असे आहे एका गटाचे मत :- पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरण समोर आल्यापासून संजय राठोड एकदाही प्रसारमाध्यमांसमोर आलेले नाहीत. ते नॉट रिचेबल आहेत. या सगळ्याचा फटका शिवसेनेच्या प्रतिमेला बसत आहे. त्यामुळे सध्याच्या घडीला संजय राठोड यांनी राजीनामा देणे योग्य ठरेल.
शिवसेनेच्या दुसर्या गटाचे मत :- यापूर्वी धनंजय मुंडे यांच्यावरही अशाप्रकारचे आरोप झाले होते. मात्र, तेव्हा धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्यात आला नाही. मग संजय राठोड यांच्याबाबतीतच नैतिकतेचा आग्रह का धरायचा?
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- फडणविसांनी विधिमंडळात मांडले ‘हे’ महत्वाचे मुद्दे; पहा नेमके कशावर काय म्हटलेय त्यांनी
- फडणवीसांच्या ‘जलयुक्त’ची चौकशी जोरात; पहा कुठे होत आहे आढावा बैठक
- आई..गं.. हेडफोनचा बसतोय असाही फटका; कोट्यावधी लोकांवर झालेत ‘हे’ दुष्परिणाम.!
- ‘तिथे ठेवलेत राठोडांनी दिलेले 5 कोटी’; पूजाच्या आजीने केला धक्कादायक दावा
- पूजाप्रकरणी कोटींचे दावे; आरोप-प्रत्यारोप आणि गोंधळात गोंधळ..!