Take a fresh look at your lifestyle.

भाजपला डरपोक म्हणत राऊतांचा हल्लाबोल; ‘त्या’ एका महिलेला सरकार घाबरले

मुंबई :  

Advertisement

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज राजकीय व्यक्तींवर ठेवण्यात येणार्‍या पाळतीविषयी भाष्य केले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Advertisement

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

Advertisement

महुआ यांनी स्पष्ट केले आहे की, ”मी बेडर आहे. सर्व संकटांशी सामना करण्यास सक्षम आहे. मी कधीही पोलीस सुरक्षा मागितलेली नाही, तरीही माझ्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी अचानक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले.

Advertisement

माझ्यावर पाळत ठेवण्यासाठीच हे सर्व सुरू आहे.” सीमा सुरक्षा दलाचे तीन जवान महुआ मोईत्रा यांच्या शासकीय निवासस्थानाबाहेर तैनात करण्यात आले.

Advertisement

”देशाच्या नागरिकांना स्वतःचे खासगीपण जपण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असून तो मला जपायचा आहे,” असे महुआ यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना कळवले आहे. महुआ यांना अशा प्रकारे जेरबंद करून वाघिणीचे गुरगुरणे व गर्जना थांबणार आहे काय?

Advertisement

राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा घणाघात महुआने केला. प. बंगालची स्थिती भाजपने चिंताग्रस्त केली आहे. काही करून प. बंगाल जिंकायचेच असा विडा या मंडळींनी उचलला आहे व त्यासाठी संपूर्ण तृणमूल काँग्रेसला फोडण्याची योजना दिसत आहे.

Advertisement

आता ताजे उदाहरण राज्यसभेचे खासदार दिनेश त्रिवेदी यांचे आहे. तृणमूलने त्यांना अनेकदा लोकसभा, राज्यसभेत पाठवले. केंद्रात मंत्री केले, पण आता त्रिवेदी यांना अचानक गुदमरल्यासारखे वाटू लागले व ते प्राणवायूच्या शोधात भाजपमध्ये गेले. हे सर्व चमत्कारिक आहे.

Advertisement

भाजप राजकारणात कोणती संस्कृती रुजवू पाहत आहे? या देशात आमच्याशिवाय दुसरा कोणीच राहता कामा नये याच मार्गाने ते प्रवास करीत असतील तर त्यांना हा देश व जनतेचे मानस नीट समजलेले दिसत नाही.

Advertisement

आजही अशा कठीण परिस्थितीशी बेडरपणे ‘सामना’ करणारे लोक आहेत. ममता बॅनर्जी, उद्धव ठाकरे, शरद पवार, पंजाबचे बादल, शेतकऱयांचे नेते राकेश टिकैत असे अनेक लोक बेडर होऊन संघर्ष करीत आहेत.

Advertisement

सरकारकडे पाळत ठेवण्याची यंत्रणा असल्याने ‘सामना’ थांबणारा नाही. महुआ यांच्यावर पाळत ठेवून सरकारने स्वतःची दुर्बलता उघड केली. एका महिलेला सरकार घाबरले हेच आता स्पष्ट झाले आहे. हुकूमशाही ही सगळ्यात जास्त डरपोक असते हे पुन्हा सिद्ध झाले. महुआ मोईत्रा यांनी त्यांचा बुरखा फाडला आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply