मुंबई :
शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज राजकीय व्यक्तींवर ठेवण्यात येणार्या पाळतीविषयी भाष्य केले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला आहे.
नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-
सरकारची बोलती बंद झाली तरी त्यांच्या हाती पोलीस, सीबीआय, गुप्तचर व्यवस्था आहे व त्यांचा वापर करून राजकीय विरोधकांवर पाळत ठेवली जात आहे वा ‘ईडी’चा फटका मारून घायाळ केले जात आहे. हा विषय एकटय़ा महुआपुरता मर्यादित नाही.
विरोधी पक्षांतील इतर अनेकांना नामोहरम करण्यासाठी याच तंत्राचा वापर केला जात आहे. अनेकांचे फोन रेकाॅर्ड केले जात आहेत, ई-मेल्स चोरून वाचले जात आहेत. हे फक्त विरोधी पक्षांपुरतेच मर्यादित नाही. सत्ताधारी पक्षातील प्रमुख लोक, मंत्री, त्यांच्या कुटुंबांवर एक प्रकारचे दडपण आहे. राजकीय वातावरणातला खुलेपणा संपला आहे.
देशाच्या राजधानीचे वातावरण गुदमरल्यासारखे झाले आहे. सरकार पक्षातील अनेकांनाही महुआप्रमाणेच भीती वाटत आहे. कोणीतरी आपल्यावर पाळत ठेवून आहे, फोन ऐकले जात आहेत.
सत्ताधारी पक्षाचे लोक संसद काळात विरोधी पक्षांच्या खासदारांशी बोलायला घाबरतात. कुणी पाहिले तर राजकीय किंमत चुकवावी लागेल असे त्यांना वाटते. सत्ताधारी पक्षाचे मंत्री, खासदारही एका सन्नाटय़ात जगत आहेत.
सामाजिक, राजकीय वातावरणात एक प्रकारची मूकबधिरता आली आहे व महुआ यांनी त्याच गुदमरलेल्या वातावरणाचा स्फोट केला आहे. महुआ यांनी स्पष्ट केले आहे की, ”मी बेडर आहे. सर्व संकटांशी सामना करण्यास सक्षम आहे.
मी कधीही पोलीस सुरक्षा मागितलेली नाही, तरीही माझ्या दिल्लीतील शासकीय निवासस्थानी अचानक सुरक्षा जवान तैनात करण्यात आले. माझ्यावर पाळत ठेवण्यासाठीच हे सर्व सुरू आहे.” सीमा सुरक्षा दलाचे तीन जवान महुआ मोईत्रा यांच्या
शासकीय निवासस्थानाबाहेर
तैनात करण्यात आले. ”देशाच्या नागरिकांना स्वतःचे खासगीपण जपण्याचा अधिकार राज्यघटनेने दिला असून तो मला जपायचा आहे,” असे महुआ यांनी दिल्ली पोलीस आयुक्तांना कळवले आहे.
महुआ यांना अशा प्रकारे जेरबंद करून वाघिणीचे गुरगुरणे व गर्जना थांबणार आहे काय? राष्ट्रवादाच्या नावाखाली देशाचे तुकडे करण्याचे कारस्थान सुरू असल्याचा घणाघात महुआने केला.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!