Take a fresh look at your lifestyle.

विरोधी पक्षांना नामोहरम करण्यासाठी भाजप वापरतय ‘ते’ तंत्र; शिवसेनेचा गंभीर आरोप

मुंबई :  

Advertisement

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनातून आज राजकीय व्यक्तींवर ठेवण्यात येणार्‍या पाळतीविषयी भाष्य केले आहे. तसेच तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव केला आहे.

Advertisement

नेमकं काय म्हटलं आहे सामनात :-

Advertisement

तृणमूल काँग्रेसच्या झुंजार खासदार महुआ मोईत्रा यांच्यावर पाळत ठेवली जात आहे. ”पाळत ठेवावी असे आपण काय केले आहे?” असा प्रश्न श्रीमती महुआ यांनी विचारला आहे. महुआ या लोकसभेत तृणमूल काँग्रेसचे प्रतिनिधित्व करतात. त्या प. बंगालातून प्रथमच निवडून आल्या, पण एखाद्या अनुभवी खासदारास मागे टाकतील अशी संसदीय झुंज त्या लोकसभेत देत आहेत.

Advertisement

प. बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना ‘बंगालची वाघीण’ असे म्हटले जाते. संपूर्ण केंद्र सरकार ममता बॅनर्जी यांची कोंडी करण्यासाठी प. बंगालात उतरले आहे. सुश्री ममता यांची नजीकची माणसे फोडून कोलकात्यात भाजप आपली घरभरणी करीत असला तरी ममता बॅनर्जी परिस्थितीशी बेडरपणे टक्कर देत आहेत.

Advertisement

अशा वाघिणीला साजेशी सहकारी म्हणून आम्ही महुआकडे पाहतो. लोकसभेत व वृत्तवाहिन्यांवरील चर्चेत या झुंजार वाघिणीने मोदी सरकारला अनेकदा घाम फोडला आहे. त्यामुळेच तिला वेसण घालण्यासाठी नको असलेली सुरक्षा व्यवस्था देऊन पाळत ठेवली जात आहे. महुआ मोईत्रा यांनी लोकसभेत देशाच्या न्यायव्यवस्थेचा बुरखा फाडणारे भाषण केले.

Advertisement

महुआ यांनी काय सांगितले? न्यायव्यवस्था आता पवित्र नाही (काल न्या. रंजन गोगोई यांनीही नेमके तेच सांगितले). केंद्र सरकार म्हणजे अफवा, चुकीची माहिती पसरविणारा फुटीर उद्योग झाला आहे अशी भूमिका त्यांनी मांडली. सगळय़ात महत्त्वाचे म्हणजे त्यांनी मोदी सरकारवर थेट हल्ला करताना सांगितले, ”काही लोक सत्तेची ताकद, कट्टरता आणि खोटेपणास शौर्य मानतात.” यावर भाजप जाम भडकला आहे.

Advertisement

तत्कालीन सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी दबावाखाली येऊन राममंदिरासंदर्भात निकाल दिल्याचा आरोप महुआ यांनी केला. महुआ यांचे राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर

Advertisement

जोरदार भाषण

Advertisement

झाले व अर्थव्यवस्थेपासून कृषी कायद्यांपर्यंत अनेक मुद्दय़ांवर त्यांनी सरकारची बोलती बंद केली, पण सरकारची बोलती बंद झाली तरी त्यांच्या हाती पोलीस, सीबीआय, गुप्तचर व्यवस्था आहे व त्यांचा वापर करून राजकीय विरोधकांवर पाळत ठेवली जात आहे वा ‘ईडी’चा फटका मारून घायाळ केले जात आहे.

Advertisement

हा विषय एकटय़ा महुआपुरता मर्यादित नाही. विरोधी पक्षांतील इतर अनेकांना नामोहरम करण्यासाठी याच तंत्राचा वापर केला जात आहे. 

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply