मुंबई :
एका बाजूला लोकांच्या हाताला काम नाहीये, ज्यांना काम आहे त्यांच्या पगारात झालेली कपात अजूनही भरून निघालेली नाहीये. एवढे असूनही महागाईने सर्वसामान्यांना नको नको केले आहे. आर्थिक संकट हटायचे नाव घेत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे.
आता पेट्रोल चक्क शंभरीपार गेलेले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी आज पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली.
परिणामी देशभरात अनेक ठिकाणी प्रीमियम पेट्रोलचा दर शंभरीपार जाऊन पोहोचला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थानात प्रीमियम पेट्रोलचा दर 100 रूपयांच्या पुढे गेला आहे.
नांदेड जिल्ह्यातील धर्माबाद तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वात महागडं पेट्रोल मिळतं. मंगळवार दिनांक 16 फेब्रुवारी रोजी धर्माबाद इथल्या पेट्रोल/डिझेलचे दर हे डोळे चक्रावून सोडणारे आहेत. आज धर्मदाबादमध्ये पेट्रोल 99.17 लिटर आणि डिझेल 88.69 प्रति लिटरवर पोहोचलं आहे.
असे आहेत देशाच्या काही महत्वाच्या शहरांमधील दर :- (पेट्रोल)
मुंबई (Mumbai Petrol Price Today): 95.46 रुपये प्रतिलिटर
नाशिक (Nashik Petrol Price Today): 95.36 रुपये प्रतिलिटर
पुणे (Pune Petrol Price Today ): 95.39 रुपये प्रतिलिटर
नागपूर (Nagpur Petrol Price Today): 95.54 रुपये प्रतिलिटर
दिल्ली (Delhi Petrol Price Today): 88.99 रुपये प्रति लिटर
कोलकाता (Kolkata Petrol Price Today): लिटर 90.25 रुपये
चेन्नई (Chennai Petrol Price Today) : 91.19 रुपये प्रति लिटर
डिझेल :-
मुंबई (Mumbai Diesel Price Today): 86.34 रुपये प्रतिलिटर
नाशिक (Nashik Diesel Price Today): 84.94 रुपये प्रतिलिटर
पुणे (Pune Diesel Price Today): 85.04 रुपये प्रतिलिटर
नागपूर (Nagpur Diesel Price Today): 85.14 रुपये प्रतिलिटर
दिल्ली (Delhi Diesel Price Today): 79.35 रुपये प्रतिलिटर
कोलकाता (Kolkata Diesel Price Today): 82.94 रुपये प्रतिलिटर
चेन्नई (Chennai Diesel Price Today) 84.44 रुपये प्रतिलिटर
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक