Take a fresh look at your lifestyle.

11 रुपयांपासून ते 92450 रुपयांपर्यंतचा दमदार प्रवास; ‘या’ शेअरने दिलेत 8400% रिटर्न

मुंबई :

Advertisement

असे म्हणतात की, शेअर बाजार अशी जागा आहे, जिथे योग्य गुंतवणूक मिळाली तर गुंतवणूकदार अल्पावधीतच करोडपती बनू शकेल. बाजारात असे अनेक लक्षाधीश शेअर्स आहेत, ज्यांच्यामुळे अनेक लोक श्रीमंत झाले आहेत. यातील एक शेअर एमआरएफचा आहे.

Advertisement

एमआरएफने स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड केल्यापासून 8400 टक्क्यांपर्यंत परतावा दिला आहे. एप्रिल 1993 मध्ये हा शेअर 11 रुपयांवर बंद झाला होता.

Advertisement

त्याच वेळी 15 फेब्रुवारी 2021 रोजी 27 वर्षांच्या कालावधीत हा शेअर  92450 रुपयांच्या किंमतीपर्यंत पोहोचला आहे. त्याचबरोबर अनेक  ब्रोकरेज हाउसेसने असा अंदाज सांगितला आहे की, या शेअरमध्ये भविष्यातही वाढ दिसून येऊ शकते. ब्रोकरेज हाऊस आनंद राठीच्या म्हणण्यानुसार, हा शेअर 104823 रुपयांवर पोहोचू शकेल.

Advertisement

एमआरएफचे संपूर्ण नाव मद्रास रबर फॅक्टरी (एमआरएफ) आहे. 1946 मध्ये या कंपनीचा पाया रचला गेला. कंपनीचा शेअर एप्रिल 1993 मध्ये स्टॉक मार्केटमध्ये लिस्टेड होता. तेव्हा शेअर्सची किंमत 11 रुपये होती. आज एमआरएफचा शेअर स्टॉक मार्केटमधील सर्वात महागडा आहे.

Advertisement

गेल्या आठवड्यात शेअर्सची किंमत 98500 रुपयांवरून 98,599.95 रुपयांवर गेली होती. 1962 मध्ये एमआरएफने टायर बनविणे सुरू केले. 1964 मध्ये, एमआरएफने टायर अमेरिकेत निर्यात करण्यास सुरवात झाली. यानंतर 1973 मध्ये देशातील पहिले रेडियल टायर आणले गेले. आज एमआरएफची बाजारपेठ 38747 कोटी रुपये आहे.

Advertisement

एमआरएफच्या फाइनेंशियल लक्षात घेता, डिसेंबरच्या तिमाहीत कंपनीचा नफा वार्षिक आधारावर दुपटीने वाढला आहे. आता तो 520.54 कोटी रुपयांवर गेला आहे. वर्षभरापूर्वी याच तिमाहीत कंपनीचा नफा 241.32 कोटी रुपये होता.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply