दिल्ली :
गुगलला आपल्या एका चुकीमुळे तब्बल 1.1 दशलक्ष युरो (1.3 दशलक्ष) आर्थिक भुर्दंड बसला आहे. फ्रेंच अधिकार्यानी दिलेल्या माहितीनुसार, सर्च इंजनने काही फ्रेंच हॉटेलसाठी चुकीचे रँकिंग दाखवले आहे. त्यामुळे गुगलला थेट एवढा दंड भरावा लागणार आहे.
यापूर्वी गुगलने हॉटेल्सला वन टू फाइव्ह स्टारचा दर्जा देण्यासाठी आपल्या अल्गोरिदममध्ये इतर हॉटेल इंडस्ट्री वेबसाइटच्या इनपुटचा वापर केला होता.
गुगलच्या रँकिंगविषयी हॉटेल मालकांच्या तक्रारी आल्यानंतर फ्रान्स सरकारने फ्रॉड और कंप्टीशन एजेंसीमार्फत 2019 आणि 2020 मध्ये ही तपासणी सुरू केली होती. त्यावेळी म्हटले होते की, 7,500 संस्थाच्या उपलब्ध माहितीनुसार त्या माहितीची खरे- खोटे तपासणे, हे या एजेंसीचे काम होते.
गुगलने म्हटले आहे की, आता गुगल मॅप्स आणि सर्चवरील हॉटेलसाठी फक्त अधिकृत फ्रेंच स्टार रेटिंग दर्शविण्यासाठी आवश्यक बदल केले आहेत.
मागील वर्षी डिसेंबरमध्ये फ्रान्सच्या डेटा प्रायव्हसी फर्मने गुगल आणि अॅमेझॉनला एकूण 163 दशलक्ष डॉलर्सचा दंड ठोठावला होता. जाहिरात कुकीजवरील देशाचे नियम मोडल्याप्रकरणी गुगलने गूगलवर १०० दशलक्ष युरोआणि 35 दशलक्ष युरो (2.२ दशलक्ष) दंड केला होता.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- मोठी बातमी…. ‘भारत बंद’ आंदोलनात पडली फुट; ‘त्या’ संघटनेने अशी घेतली भूमिका
- तब्बल ‘एवढे’ व्यापारी देणार भारत बंदची हाक; वाचा, काय असणार सुरू आणि कशाला असेल टाळे
- महिला व बालकल्याणाकरिता ‘एवढा’ निधी ठेवण्यात येणार राखीव; पहा, कशी असणार तरतूद
- अभिनेता ऋतिक रोशन अडचणीत; ‘त्याप्रकरणी’ मुंबई क्राईम ब्रांचने धाडले समन्स
- शक्तीप्रदर्शनानंतर फुटला कोविड बॉम्ब; पोहरादेवी महंतांसह आठजण करोनाबाधित