Take a fresh look at your lifestyle.

IMP News : भाजपचा दक्षिण आशियावरच डोळा; शहांच्या नेतृत्वाखाली ‘त्या’ दोन देशांत विस्तार योजना..!

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांची जोडी म्हणजे राजकारणातील एक आश्चर्य आहे. योग्य निवडणूक व्यवस्थापन करून या दोघांनी आपली महत्वाकांक्षी योजना पूर्णत्वास आणली आहे. ती म्हणजे भारतावर भाजपचा भगवा फडकवण्याची. आता हाच भगवा हिंदुत्ववादी विचार अख्ख्या दक्षिण आशियामध्ये पेरण्याची महत्वाकांक्षी योजना शाह यांनी हाती घेतली आहे.

Advertisement

त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री विप्लव देव यांनी भाजपचा हा नवा धासू प्लॅन जगजाहीर केला आहे. एका कार्यक्रमादरम्यान देव यांनी भाजपच्या आगामी विस्तार प्रकल्पाबद्दल माहिती दिली आहे. ते म्हणाले की, भाजप केवळ देशातच नव्हे तर शेजारच्या नेपाळ आणि श्रीलंका या देशांमध्येही विस्तार करण्याचा विचार करीत आहे.

Advertisement

मोदी आणि शाह यांची जोडगोळी खूप महत्वाकांक्षी आहे. त्यांनी देशातून विरोधी पक्ष हद्दपार करून एकहाती वर्चस्व सिद्ध करण्याचासाठी प्रयत्न चालवले असल्याची टीका होत आहे. त्यासाठी केंद्र सरकारच्या विविध संस्था ते राजकीयदृष्ट्या वापरत असल्याचेही बोलले जात आहे. त्याच शाह यांनी अख्खा दक्षिण आशिया भगव्या रंगाचा करण्याचा धासू प्लॅन तयार केलेला आहे.

Advertisement

देव म्हणाले की, गृहमंत्री शहा हे पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी नेपाळ आणि श्रीलंकेत आपले सरकार बनवण्याची योजना आखली होती. त्यावेळी पक्षाच्या बैठकीत अमित शहा यांनी भारतातील सर्व राज्ये जिंकल्यानंतर परदेशी विस्तारावरही चर्चा केली. शाह यांनी म्हटले होते की आता श्रीलंका आणि नेपाळमध्ये पक्षाचा विस्तार व्हावा.

Advertisement

देव यांनी हा दावा केल्याने याचे जागतिकदृष्ट्या परिणाम होण्याची शक्यता आहे. आशिया खंडाच्या राजकारणात अमेरिका, रशिया आणि चीन यांचा हस्तक्षेप असल्याची टीका भारतीय राजकीय पक्ष वेळोवेळी करीत असतात. आता देव यांच्या वक्तव्याने इतर देशात भारतही डोके लावत असल्याच्या पाकिस्तानच्या आरोपांना यामुळे पुष्टी मिळणार आहे.

Advertisement

काही वर्षांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनीही लाल किल्ल्यावर भाषणात पाकिस्तानच्या बलुचिस्तान भागात भारत हस्तक्षेप करू शकतो असे वक्तव्य केले होते. त्यावेळीही पाकिस्तानने भारताच्या राजकीय हस्तक्षेपाचा मुद्दा जगभरात नेला होता. आताही पाकिस्तान किंवा इतर देश असे यानिमित्ताने करू शकतात.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply