अपघात झाल्यावर अनेक सुखासीन कुटुंब संकटांच्या खाईत जातात. तसेच त्याच्याही पुढे जाऊन देश, समाज आणि मुख्य म्हणजे महिलांना अपघाताचे धक्के एका वेगळ्याच वळणावर घेऊन जातात, असे जागतिक बँकेच्या अहवालात म्हटलेले आहे. त्यावरून दु:ख व्यक्त करताना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी काही ठोस सूचनाही दिलेल्या आहेत.
‘ट्रॅफिक क्रॅश इंजरी अँड डिसएबिलिटी: द बर्डन ऑन इंडियन सोसायटी’ हा अहवाल उत्तरप्रदेश, बिहार, तामिळनाडू आणि महाराष्ट्रातील सर्वेक्षणाच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील 56 टक्के लोकांचे आयुष्य बाधित झाल्याचे आकडे आलेले आहेत.
घरातील कर्ता अपघातात गेल्यावर घराची जबाबदारी स्त्रियांवर पडतो. सर्वेक्षणात असे आढळले आहे की, अशा 75 टक्के लोकांना आर्थिक पेचप्रसंगाचा सामना करावा लागतो. तसेच त्याचा परिणामही दीर्घ कालावधीसाठी असतो. अभ्यासानुसार 40 टक्के महिलांनी त्यांचा दिनक्रम आणि सामाजिक स्थिती बदलली आहे.
जागतिक बँकेच्या अहवालाच्या आकडेवारीनुसार मंत्री गडकरी यांनी म्हटले आहे की, देशभरातील सर्व राज्यांनी मोटार वाहन कायदा तातडीने अंमलात आणण्याची आवश्यकता आहे. तसेच रस्त्यावर होणारे अपघात आणि त्यात सामील झालेल्या कुटुंबाचे दु:ख चिंताजनक आहे. त्यामुळे रस्ते अपघात कमी करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारांनी एकत्रितपणे एक प्रभावी योजना तयार केली पाहिजे जेणेकरून लोकांच्या कुटुंबाचा नाश होण्यापासून वाचला जाऊ शकेल.
दिल्ली पोलिसांचे सह पोलिस आयुक्त आलोक कुमार रस्ते सुरक्षा जनजागृतीवर काम करतात. याबाबतीत ते म्हणतात की, जर प्रत्येक व्यक्ती रस्ता सुरक्षेच्या दिशेने जागरूक झाली तर अपघात कमी होण्यासह कुटुंबातील ज्यांना दुर्घटनांचा सामना करावा लागतो त्यांनाही अशा समस्येचा सामना करावा लागणार नाही.
अपघात कमी होण्याची किंवा न होण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनापासून सर्वसामान्यांपर्यंत सर्वांची आहे. जागतिक बँकेच्या अहवालातून सत्य समोर आले आहे की, याचे आर्थक, सामाजिक व कौटुंबिक दुष्परिणाम भयंकर आहेत. त्याबद्दल चिंतन करून सुधारणेला प्राधान्य द्यायला पाहिजे, असेही अलोक कुमार यांनी म्हटले आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स