अहमदनगर :
नगर जिल्हा बँकेची निवडणूक चांगलीच चर्चेत आहे. अगदी राज्यातील नेतेसुद्धा या निवडणुकीवर लक्ष ठेऊन आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवारांनीसुद्धा या निवडणुकीत रस घेतला असल्याने ही निवडणूक ऐतिहासिक झाली. जिल्हा बँकेच्या इतिहासात पहिल्यांदाच तब्बल 17 सदस्यांची निवड बिनविरोध झाली आहे.
या निवडणुकीच्या केंद्रस्थानी राहून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात आणि अजित पवारांनी सूत्रे फिरवली. यात रोहित पवारही पुढे होते. आता जिल्हा बँकेवर महाविकास आघाडीचे वर्चस्व राहणार असल्याची शक्यता खूपच वाढली आहे.
सुरूवातीला नगर जिल्हा बँकेची सूत्रे मंत्री थोरात यांच्याकडे असणार, अशा चर्चा सुरू होत्या. मात्र आता वरिष्ठ पातळीवर चालू असलेल्या चर्चांमधून राहुरीचे आमदार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्याकडे सूत्रे जाणार असल्याचे समजत आहे.
विखे एकाकी असतानाही त्यांनी चांगली बाजी मारली आहे. मात्र सूत्रे ही महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे पर्यायाने बाळासाहेब थोरात यांच्याकडे येणार होती. मात्र थोरात यांचा वाढलेला व्याप लक्षात घेता आता बँकेचे नेतृत्व दुसऱया कुणाकडे देऊन बँकेचा कारभार व्यवस्थितरीत्या बघितला जावा, असा मुद्दा पुढे आला आहे.
आता मंत्री थोरात हे युवा नेतृत्व तनपुरे यांना संधी देणार का?, हे पाहणे महत्वाचे आहे. दरम्यान माजी खासदार यशवंतराव गडाख यांनी काही दिवसांपूर्वी ‘नगर जिल्हा बँकेत महसूलमंत्री थोरात यांनी लक्ष घालून बँक पुन्हा नावारूपाला आणावी’, असा सल्ला दिला होता.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट