पुणे / मुंबई :
भारत हा लोकशाही मानणारा देश आहे. त्यामुळे इथे सत्तांतर रक्तरंजित नाही, तर निवडणुकीच्या मैदानात होते. त्याद्वारे देशात सरकार स्थापन होते. तसेच केंद्र सरकारच्या आस्थापनेवर नोकरशहा नियुक्त असतात. त्या सर्वांना किती पगार आणि भत्ते मिळतात हा सर्वांच्या कौतुकाचा विषय आहे. आज आपण हीच महत्वाची माहिती पाहणार आहोत.
राष्ट्रपती, पंतप्रधान, राज्यपाल, चीफ जस्टीस, निवडणूक आयुक्त, सेक्रेटरी, मंत्री आणि खासदार अशा सर्वांना एक फिक्स पगार आणि भत्ते मिळतात. पदानुसार त्यात बदल असतो. हे सगळे पगार आणि भत्ते संसदेत किंवा मंत्रिमंडळ बैठकीत ठरवले जातात.
आज आपण या महत्वाच्या पदावरील व्यक्तींना नेमका किती पगार आणि भत्ते मिळतात याचे कोष्टक पाहणार आहोत. ते पुढीलप्रमाणे :
अतिमहत्वाचे पद 1
पदाचे नाव | मासिक पगार (+ इतर भत्ता) |
राष्ट्रपती | ₹500,000 |
उपराष्ट्रपती | ₹400,000 |
पंतप्रधान | ₹480,000 |
राज्यपाल | ₹350,000 |
चीफ जस्टीस (सुप्रीम कोर्ट) | ₹280,000 |
न्यायाधीश (सुप्रीम कोर्ट) | ₹250,000 |
मुख्य निवडणूक आयुक्त | ₹250,000 |
कंट्रोलर & ऑडीटर जनरल (कॅग) | ₹250,000 |
चेअरमन, युपीएससी | ₹250,000 |
कॅबिनेट सेक्रेटरी | ₹250,000 |
लेफ्टनंट गव्हर्नर (उपराज्यपाल) | ₹110,000 |
चीफ ऑफ स्टाफ (आर्मी, नेव्ही & एअरफोर्स) | ₹250,000 |
चीफ जस्टीस (हाय कोर्ट) | ₹250,000 |
न्यायाधीश (हाय कोर्ट) | ₹225,000 |
अतिमहत्वाचे पद 2
खासदार (मेंबर ऑफ पार्लमेंट) | ₹100,000 |
केंद्र सरकारचे सचिव / व्हाईस चीफ ऑफ स्टाफ (आर्मी, नेव्ही & एअरफोर्स) | ₹225,000 |
चीफ सेक्रेटरी आणि समकक्ष इतर पद | ₹225,000 |
अॅडिशनल सेक्रेटरी व रजिस्ट्रार (सुप्रीम कोर्ट) | ₹182,200 ते ₹224,100 |
प्रिन्सिपल सेक्रेटरी व रजिस्ट्रार (हाय कोर्ट) | ₹182,200 ते ₹224,100 |
जॉइंट सेक्रेटरी / मेजर जनरल | ₹144,200 ते ₹218,200 |
सेक्रेटरी (राज्य सरकार) व अॅडिशनल रजिस्ट्रार (हाय कोर्ट) | ₹144,200 ते ₹218,200 |
ता.क. : वरील पद हे देशातील महत्वाचे पद आहेत. या पदामध्ये पगार आणि भत्ते यामध्ये वेळोवेळी बदल होत असतात. जबाबदारीच्या पदावर काम करणाऱ्या या व्यक्तींना मिळणारे हे पगार आणि भत्ते याबाबतची माहिती विकिपीडिया या ओपन सोर्स मिडियाच्या मदतीने प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. यात काही चूक किंवा सूचना असल्यास त्यांचे स्वागत आहे.
संपादन : सचिन मोहन चोभे
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- टोमॅटो बाजारभाव अपडेट : पुण्यात 1500 तर सोलापुरात 400; वाचा, संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : ज्वारीच्या दरातही सलग दुसर्या दिवशी घसरण; पहा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,050 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : सलग 3 दिवसांपासून कांद्याच्या दरात घसरण; वाचा, संपूर्ण राज्यातील ताजे मार्केट रेट