अमित शहांचा आहे धासू प्लॅन; देवांनी जाहीर केली भाजपची ‘ती’ महत्वाकांक्षी योजना..!
दिल्ली :
त्रिपुरा राज्याचे मुख्यमंत्री विप्लव देव हे आपल्या धमाकेदार राजकीय वक्तव्यांसाठी फेमस आहेत. आताही त्यांनी भाजपचा नवा धासू प्लॅन जगजाहीर केला आहे. गृहमंत्री आणि पक्षाचे प्रमुख मार्गदर्शक असलेल्या अमित शाह यांचा हा धासू प्लॅन आहे.
देव आपल्या विचित्र वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आहेत. ते म्हणजे अगरतला येथील एका कार्यक्रमादरम्यान देव म्हणाले की, भाजप केवळ देशातच नव्हे तर शेजारच्या देशांमध्येही विस्तार करण्याचा विचार करीत आहे. नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपाच्या कथित महत्त्वाकांक्षा त्यांनी उघड केल्या आहेत.
देव म्हणाले की, गृहमंत्री अमित शहा भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी नेपाळ आणि श्रीलंकेत आपले सरकार बनवण्याची योजना आखली होती. देव यांनी 2018 मध्ये अमित शहा यांच्याशी झालेल्या संभाषणाचा संदर्भ देत म्हणाले की, अमित शहा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असताना त्यांनी हे बोलले होते.
ते म्हणाले की, त्यावेळी पक्षाच्या बैठकीत अमित शहा यांनी भारतातील सर्व राज्ये जिंकल्यानंतर परदेशी विस्तारावरही चर्चा केली. त्यावेळी आम्ही गेस्ट हाऊसमध्ये बोलत होतो. ज्यामध्ये अजय जामवाल म्हणाले होते की, अनेक राज्यांत भाजपने आपले सरकार स्थापन केले आहे, त्यास अमित शाह यांनी उत्तर दिले की आता श्रीलंका आणि नेपाळचा विस्तार व्हावा.
याशिवाय मुख्यमंत्री देव यांनी पुढच्या आर्थिक वर्षाच्या अर्थसंकल्पाचे कौतुक करताना म्हटले आहे की, आत्मनिर्भर दक्षिण आशिया बनविण्याच्या दृष्टीने हे एक पाऊल आहे. भारताची धोरणे व कृती बांगलादेश, भूतान आणि नेपाळला स्वावलंबी बनविण्यात सक्षम आहेत.
मुख्यमंत्री बिप्लब देव यांच्या विधानानंतर विरोधी पक्ष सीपीएम आणि कॉंग्रेसने त्यांच्यावर त्वरित कारवाई करण्याची मागणी केली आहे. दोन्ही पक्षांनी बिप्लब देव यांच्या विधानाचे वर्णन लोकशाहीच्या विरोधी असल्याचे म्हटले आहे. याव्यतिरिक्त, अमित शहा यांना परदेशात सरकार बनविण्याच्या आपल्या सरकारच्या दाव्यासंदर्भात परिस्थिती स्पष्ट करण्याची मागणी केली आहे.
संपादन : संतोष वाघ
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- PM मोदी आणि सीतारामन यांच्या आकडेवाडीत कोट्यावधींची तफावत; वाचा, नेमका कुठे झालाय घोळ
- मोठी बातमी… मोदी सरकार ‘या’ क्षेत्रातील शेकडो कंपन्या विकणार
- मराठा आरक्षण उपसमितीने घेतला सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या तयारीचा आढावा; वाचा, काय आहे परिस्थिती
- आता 7/12 आणि घरावर लागणार पत्नीचे नाव; महिलांनो, तुमच्या फायद्याची ही योजना घ्या समजून
- अवघ्या ६९ रुपयात मिळवा गॅस सिलिंडर; त्यासाठी करावे लागेल ‘हे’ एकच काम