Take a fresh look at your lifestyle.

नगरमध्ये मोठा कोरोना घोटाळा; तब्बल ‘एवढ्या’ कोटींचा घातलाय घोळ !

मुंबई :

Advertisement

राज्यात अनेक ठिकाणी विविध कोरोना घोटाळे उघडकीस येत आहेत. अशातच नगरमधून थेट 28 कोटींचा घोळ समोर येण्याची शक्यता आहे. जिल्हा परिषदेमधील भाजपचे गटनेते जालिंदर वाकचौरे यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे.

Advertisement

त्यांनी म्हटले की, करोना कालावधीत नगर जिल्हा नियोजन आणि जिल्हा आपत्ती व्यवस्थापन तसेच आरोग्य यंत्रणेकडून तब्बल 28 कोटी रुपयांचा खर्च केल्याचे दाखविण्यात येत आहे.

Advertisement

मात्र खर्चाची ही आकडेवारी संशयास्पद आहे. त्यामुळे खर्चाचा तपशिल तपासण्यासाठी नाशिकच्या विभागीय आयुक्त कार्यालयाकडे तक्रार करणार  आहे.

Advertisement

जिल्हा नियोजन, आरोग्य यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन कार्यालयाने दाखवलेला खर्च :- 21 कोटी 23 लाख 44,218, 4 कोटी 50 लाख आणि 2 कोटी 36 हजार

Advertisement

तालुकावाईस खर्च :- नगर 28 लाख 32 हजार, नेवासा 4 लाख 77 हजार, शेवगाव 18 लाख 36 हजार, पाथर्डी 15 लाख, कर्जत 10 लाख 10 हजार, जामखेड 5 लाख, श्रीगोंदा 7 लाख, पारनेर 15 लाख 51 हजार, राहुरी 5 लाख, श्रीरामपूर 10 लाख 52 हजार, राहाता 13 लाख, कोपरगाव 30 लाख 8 हजार, संगमनेर 13 लाख 70 हजार, अकोले 24 लाख.

Advertisement

नगर जिल्ह्यात करोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा खर्च कोट्यवधी रुपयांचा आहे. जिल्हा नियोजन, आपत्ती व्यवस्थापन आणि आरोग्य यंत्रणेने केलेला बराच खर्च हा निव्वळ कागदावर असून, बिलेही अदा झालेली आहेत.

Advertisement

राज्य सरकारने याबाबत झालेल्या खर्चाचे कठोर आणि काटेकोर लेखापरिक्षण केल्यास त्यातून मोठा घोटाळा समोर येण्याचीच दाट शक्यता आहे. संपूर्ण खर्च बघता त्यामानाने मिळालेल्या सुविधा संशयास्पद वाटत आहेत, असा आरोप वाकचौरे यांनी केला आहे.   

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply