मुंबई :
एका बाजूला लोकांच्या हाताला काम नाहीये, ज्यांना काम आहे त्यांच्या पगारात झालेली कपात अजूनही भरून निघालेली नाहीये. एवढे असूनही महागाईने सर्वसामान्यांना नको नको केले आहे. आर्थिक संकट हटायचे नाव घेत नाहीये आणि दुसऱ्या बाजूला लॉकडाऊन सुरु झाल्यापासून दिवसेंदिवस पेट्रोलच्या दरात वाढ होत आहे.
आता पेट्रोल चक्क शंभरीपार गेलेले आहे. सरकारी तेल कंपन्यांनी रविवारी पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत पुन्हा एकदा वाढ केली. त्यानुसार पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत अनुक्रमे 29 आणि 32 पैशांची भर पडली.
परिणामी देशभरात अनेक ठिकाणी प्रीमियम पेट्रोलचा दर शंभरीपार जाऊन पोहोचला. महाराष्ट्रासह मध्य प्रदेश आणि राजस्थानात प्रीमियम पेट्रोलचा दर 100 रूपयांच्या पुढे गेला आहे.
असे आहेत पेट्रोलचे राज्यातील दर :-
परभणी 97.59
मुंबई 95.46
कोल्हापूर 95.60
नाशिक 95.82
पुणे 95.12
गुहागर 96.81
हिंगोली 96.35
जळगाव 96.52
औरंगाबाद 96.62
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज