मुंबई :
जवळपास संपूर्ण महाराष्ट्रात आता पेट्रोल-डिझेलचे दर शंभरीला टेकलेले आहेत. प्रीमियम किंवा पॉवर पेट्रोलने शंभरी पार केली आहे. या दरामुळे तुम्ही महागाईने परेशान झालेले असाल. मात्र पेट्रोलपंपवाल्यांची एक वेगळीच आणि मोठी अडचण झालेली आहे.
सध्या पेट्रोल आणि डिझेलचे दर 100 रुपयांच्या नजीक येऊन ठेपले आहेत. मात्र, प्रीमियम पेट्रोलने केव्हाच शंभरी ओलांडली आहे. परंतु, राज्यात अनेक ठिकाणच्या पेट्रोल पंपांवर अजूनही जुन्याच मशीन्स वापरल्या जात आहेत. या मशिन्समध्ये तीन अंकी किंमत दर्शविण्याची सुविधा नसल्यामुळे (100 पेक्षा जास्त) पंपचालकांना पेट्रोल विक्री थांबवावी लागली.
आता या अडचणीमुळे अनेक पेट्रोलपंप चालकांची मोठी अडचण झाली आहे. आता नवी यंत्रे उपलब्ध होईपर्यंत किंवा पेट्रोलचे दर कमी होईपर्यंत पेट्रोलपंप चालकांना अडचणीला सामोरे जावे लागणार आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक