मुंबई :
लॉकडाउनपासून गॅसच्या दरात सुरू झालेली वाढ अजूनही थांबलेली नाही. एका बाजूला महागाई आणि बहुतांश क्षेत्रातील मंदीमुळे आधीच आर्थिक विवंचनेत असलेल्या भारतीयांना पेट्रोलसह गॅस दरवाढीचा मोठा फटका सहन करावा लागत आहे.
दिवसेंदिवस महागाई वाढत आहे. अशातच तुमच्या खिशावर अजूनच भार पडणार आहे. इंधन दरवाढीनंतर आता घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात पुन्हा एकदा मोठी वाढ करण्यात आली आहे.
एलपीजीच्या दरात आता 50 रुपयांनी वाढ करण्यात आली. त्यामुळे ग्राहकांना 14 किलो वजनाच्या विनाअनुदानित सिलेंडरसाठी 769 रुपये मोजावे लागणार आहे.
सध्या रोज वाढनार्या पेट्रोल आणि डिझेलने लोकांना नको नको करून सोडले आहे. सर्वसामान्य माणसांची डोकेदुखी इंधनाच्या वाढत्या भावाबरोबर वाढत आहे. अशातच गॅस दरवाढीमुळे आता सर्वसामान्य नागरिक हैराण होणार आहेत.
आज दुपारी 12 पासून हे दर लागू होणार आहे. फेब्रुवारी महिन्यात दुसऱ्यांदा गॅस सिलेंडरच्या दरात वाढ झाली आहे. या अगोदर 4 फेब्रुवारीला विनाअनुदानित सिलेंडरच्या किंमतीत 25 रूपयांनी वाढ झाली होती. सिलेंडरची किंमत 694 रूपयांवरून 719 रुपये करण्यात आली होती.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- म्हणून अदानी-अंबानींच्या संपत्तीत इतकी दमदार वाढ; पहा कोण आहे आघाडीवर..!
- म्हणून औरंगाबादेत निर्माण झाला तणाव; शिवसेनेचे नेते माजी आमदार झाले झटक्यात फरार..!
- MG ने दिल्या 5 रेट्रोफिटेड हेक्टर अॅम्ब्युलन्स; गडकरींच्या हस्ते सेवेला सुरुवात
- म्हणून सोयाबीन खातेय भाव; पहा कुठे कितीवर स्थिरावलेत मार्केट रेट
- हरबऱ्यामध्ये तेजी, मात्र मिळेना हमीभाव; पहा राज्यभरात कुठे, किती मिळतोय बाजारभाव