Take a fresh look at your lifestyle.

IMP NEWS : अजूनही केमिकल कंपन्या मोकाट; सगळी जबाबदारी फ़क़्त शेतकऱ्यांची..!

मुंबई :

Advertisement

सरकारी यंत्रणेने किंवा एखाद्या खासगी कंपनी किंवा संस्थेने काहीही केले तरीही पैसा आणि झुंडीच्या जोरावर झाकण्याची भारतीय रीत आहे. त्याचाच कित्ता कीटकनाशक कंपन्यांना वाचवण्यासाठी महाराष्ट्रात वापरला जात आहे. आतापर्यंत हजारो शेतकरी आणि मजुरांनी जीव गमावूनही यामध्ये कृषी व आरोग्य विभागाने ठोस मार्ग काढलेला नाही.

Advertisement

ही बातमी आहे २ अाॅक्टाेबर २०१७ राेजी शासनाने परिपत्रक जारी केलेल्या कीटकनाशकांची फवारणी करण्याच्या नियमांची. यातील सर्व नियम हे शेतकऱ्यांसाठी लागू आहेत. बलाढ्य आणि मुजोर केमिकल कंपन्या आणि कृषी सेवा केंद्राच्या चालकांना यातून बाजूलाच ठेवण्यात आलेले आहे.

Advertisement

कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकरी, शेतमजूर यांनी प्रतिबंधात्मक किटचा म्हणजेच हातमाेजे, चष्मा, मास्क, टाेपी, अॅप्राॅन, बूट इत्यादीचा वापर कटाक्षाने करावा, शेतमालकाने कीटकनाशकांची फवारणी करताना स्वत:ला, घरातील कुटुंबीयांना अथवा शेतमजुरांना विषबाधा झाल्यास प्रथमाेपचार करण्याच्या दृष्टिकाेनातून प्रथमाेपचाराचे साहित्य शेतावर उपलब्ध ठेवावे अादी महत्वाचे मुद्दे त्या परिपत्रकात आहेत.

Advertisement

विषबाधा झाल्यास त्याची नैतिक व कायदेशीर जबाबदारी संबंधित शेतमालकाची राहील, असेही त्यात नमूद केले आहे. एकूणच यातून कंपन्या आणि दुकानदार यांना थेट क्लीनचीट मिळालेली आहे. तसेच कृषी विभाग व सार्वजनिक आरोग्य व्यवस्था यांनाही पूर्णपणे मोकळीक आहे.

Advertisement

दरम्यान, कृषी विभागाने यापूर्वी अकाेल्यात कीटकनाशक साठवणूक स्थळांची धडक तपासणी माेहीम राबवली हाेती. यात १० हजार ८०१ लिटर कीटकनाशकाच्या विक्री बंदचे अादेश कृषी विभागाने दिले अाहे. या कीटकनाशकाची किंमत १ काेटी २६ लाख १७ हजार रुपये अाहे. अनेक ठिकाणी कीटकनाशके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे उजेडात अाले हाेते. मात्र माेहिमेनंतरही हे प्रकार थांबत नसल्याचे चित्र अकोल्यासह राज्यभरात आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply