Take a fresh look at your lifestyle.

‘त्यासाठी’ मोदी सरकार करणार 700 कोटींचा खर्च; पहा शेतकऱ्यांसाठीच्या खास योजनेची माहिती

मुंबई :

Advertisement

देशातील शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याचा विडा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारने घेतला आहे. त्यानुसार त्यांनी शेती क्षेत्रात खासगी गुंतवणूक आणण्यासाठी कृषी सुधारणा विधेयक आणतानाच आणखीही काही योजना आणलेल्या आहेत. त्यातील महत्वाची योजना असेल शेतकरी उत्पादक कंपन्या बनवण्याची.

Advertisement

2021-22 मध्ये सरकार 2,500 शेतकरी उत्पादक संस्था (एफपीओ) स्थापन करणार आहे. यासाठी 700 कोटी रुपये खर्च केले जातील. यामुळे 60 हजार शेतकर्‍यांना मदत होईल, असे सरकारचे म्हणणे आहे. एफपीओच्या स्वरूपात, लहान आणि सीमांत शेतकर्‍यांच्या गटाकडे शेतमाल विक्रीसाठी सौदा करण्याची शक्ती तयार होईल.

Advertisement

केंद्रीय कृषी मंत्रालयाने सांगितले आहे की, 2500 एफपीओ तयार करण्याचे काम हे केंद्राच्या योजनेचा एक भाग आहे. ज्याअंतर्गत सरकारने पाच वर्षात 6,865 कोटी रुपयांच्या तरतूदीसह 10,000 एफपीओ तयार करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.

Advertisement

कृषी कायद्यांच्या यशस्वी अंमलबजावणीमध्ये एफपीओ महत्त्वाची भूमिका बजावेल असे मोदी सरकारला वाटत आहे. यामुळे शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढेल आणि शेतकरी थेट कंपन्यांना शेतमाल विकत विकू शकेल. कंत्राटी शेतीतून शेती करणाऱ्यांना एफपीओकडून मोठी मदत मिळेल, असेही अधिकाऱ्यांना वाटत आहे.

Advertisement

शेतकरी उत्पादक संस्था ही कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत शेतकर्‍यांचा एक गट आहे. हे शेतीच्या संबंधित कामांना पुढे करण्यास मदत करते. बरेच शेतकरी एफपीओशी संबंधित आहेत. यामुळे त्यांना पिकाला योग्य दर मिळणे सोपे होते.

Advertisement

ता. क. : (फ़क़्त मेसेज करून मार्गदर्शनासाठी वेळ घ्यावी; थेट फोन करू नये) कोणालाही फार्मर्स प्रोड्युसर कंपनी स्थापना व मार्केटिंग यासाठी माहिती हवी असल्यास ‘कृषीरंग’कडे (मो. ९४२२४६२००३) आणि कृषी प्रक्रिया व तंत्रज्ञान याबाबत मार्गदर्शन आवश्यक असल्यास बायोमी टेक्नॉलॉजीज (मो. ८३७८८७८८७०) यांच्याकडे संपर्क साधावा.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply