दिल्ली :
पैसे हा घटक कोणालाही घातक बनवू शकतो. त्याचाच प्रत्यय हरियाणा येथील एका दुर्दैवी घटनेतून आलेला आहे. हरियाणातील रोहतकच्या जाट कॉलेजमध्ये कुस्तीच्या टीम आखाड्यात पाच राष्ट्रीय खेळाडूंचे सामूहिक हत्याकांड झाले आहे. याप्रकरणी प्रशिक्षक सुखविंदर मोर याचा पोलीस शोध घेत आहेत.
जाट कॉलेजमध्ये कुस्तीचा आखाडा आहे. हा आखाडा नाेंदणीकृत नव्हता. मात्र, यातील 100 खेळाडूंकडून प्रत्येकी दोन हजार रुपये प्रतिमहिना घेतला जात होता. म्हणजे महिन्याला २ लाख कमाईचा हा आखाडा होता. त्याच पैशांच्या वादातून पाच राष्ट्रीय खेळाडू देशाने गमावले आहेत.
पैशांवर प्रशिक्षकांची नजर होती. कुणालाही तो सोडायचा नव्हता. मनोज मलिक जाट कॉलेजच्या शारीरिक शिक्षण विभागाचे प्रमुख होते. त्यामुळे आखाड्याची सूत्रे त्यांच्या हाती होती. परंतु प्रशिक्षक सुखविंदर मोर यांना आखाड्याची सूत्रे आपल्या हाती असावीत, कमाईतदेखील वाटा असावा, असे वाटे. त्यातून वाद झाल्यावर पुढे हे दुर्दैवी प्रकरण घडले.
हत्याकांडात सुखविंदर मोर मुख्य आरोपी आहे. काही दिवसांपासून तो येथे प्रशिक्षक म्हणून काम पाहत होतो. काही तक्रारींनंतर मनोज मलिक यांनी सुखविंदरला पदावरून हटवले होते. याच वैमनस्यातून सुखविंदरने हत्याकांड घडवले. त्याला अटक करण्यासाठी पोलिसांनी त्याच्यावर एक लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले आहे.
प्रत्यक्षदर्शी खेळाडूंच्या म्हणण्यानुसार शुक्रवारी सायंकाळी जिम्नॅशियम हॉलमध्ये सराव सुरू होता. यादरम्यान सुखविंदरने प्रत्येक खेळाडूला एकेक करून फोनवरून विश्रांती कक्षात बोलावले. नंतर त्याने त्यांच्या डोक्यात व गळ्यावर गोळ्या घातल्या. सुखविंदर खोलीला कुलूप लावून पसार झाला होता. परंतु मुलाच्या रडण्याच्या आवाजाने इतर खेळाडूंना हत्याकांड कळले.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बॉलिवूडच्या दारावर इन्कम टॅक्सची धडधड; वाचा, कुणाकुणावर झाली कारवाई
- दोन स्टॉक आणि दोन महिने; वॉरेन बफेने कमावले तब्बल 60 हजार कोटी
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स