Take a fresh look at your lifestyle.

मोदींच्या क्रिकेटप्रेमी फोटोवर पटोलेंनी विचारला ‘तो’ खोचक प्रश्न..!

पुणे :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अजून एकदाही ठोस पद्धतीने दिल्लीतील शेतकरी आंदोलनाची दखल घेतलेली नाही. उलट आंदोलक देशद्रोही किंवा सरकारच्या विरोधी असल्याचे सांगून या मुद्द्यावर बोलणे किंवा कार्यवाही करणे सत्ताधारी भाजपने टाळले आहे.

Advertisement

तोच धागा पकडून आज कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान मोदींना एक प्रश्न केला आहे. त्याला निमित्त ठरले आहे मोदींच्या क्रिकेटप्रेमी ट्विटचे. मोदींनी आज दक्षिण भारतात भेट दिल्यावर क्रिकेट मैदानाचा एक फोटो शेअर केला आहे.

Advertisement

आकाशातून बर्ड आय व्ह्यूद्वारे मैदानातील सामना पाहायला मिळाल्यावर त्यांनी आनंद व्यक्त केला आहे. त्यावर पटोले यांनी दिल्लीतील शेतकरी आंदोलन दिसत नाही का असा प्रश्न केला आहे.

Advertisement

पटोले यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, प्रधानमंत्री @narendramodi जी अगोदर अडीच महिन्यांपासून देशभरातील शेतकरी दिल्ली च्या सिमेवर आपल्या न्यायिक मागण्या व हक्का साठी बसलेले आहेत… ते तुम्हाला दिसत नाही काय??

Advertisement

आता यावर महाराष्ट्र भाजप किंवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोणती प्रतिक्रिया देतात याकडे राज्याचे लक्ष लागलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply