औरंगाबाद :
वीजबिलांच्या थकबाकीमुळे संकटात सापडलेल्या महावितरणच्या मदतीला आता बळीराजा धावला आहे. कृषिपंपाच्या वीजबिल थकबाकीत सवलत देणाऱ्या महाकृषी ऊर्जा अभियानास औरंगाबाद परिमंडलात शेतकऱ्यांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे.
अभियानाच्या पहिल्या पंधरवड्यातच १७०२ कृषिपंप ग्राहकांनी एक कोटी १२ लाख रुपयांच्या थकबाकीचा भरणा करून जवळपास ७० टक्के रकमेची सवलत मिळवली आहे. या अभियानाच्या माध्यमातून औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील कृषिपंप ग्राहकांना थकबाकीमुक्त होण्याची संधी उपलब्ध झाली असून या सुवर्णसंधीचा लाभ घेण्याचे आवाहन मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांनी केले आहे.
औरंगाबाद परिमंडलात एकूण ३ लाख ५५ हजार ४२७ कृषिपंप ग्राहकांकडे ४४६० कोटी ९७ लाख रुपयांचे वीजबिल थकित आहे. यातील निर्लेखन, व्याज व विलंब आकाराचे एकूण १८१७ कोटी ८९ लाख रुपये महावितरणकडून माफ करण्यात आले आहेत. या कृषी ग्राहकांनी उरलेल्या २६४३ कोटी ८ लाखांच्या मूळ थकबाकीपैकी ५० टक्के रकमेचा वर्षभरात भरणा केल्यास थकबाकीची उर्वरित ५० टक्के म्हणजे १३२१ कोटी ५४ लाखाची रक्कम माफ करण्यात येणार आहे. सोबतच त्यांचे थकित वीजबिलही कोरे होणार आहे.
या अभियानात भाग घेणाऱ्या शेतकऱ्यांना निर्लेखन, व्याज व विलंब आकारात माफी तसेच मूळ थकबाकीतही पहिल्या वर्षी ५० टक्के सवलत अशी एकूण थकबाकीत जवळपास ७० टक्के सवलत मिळत आहे. शेतकऱ्यांना एकूण थकबाकीच्या केवळ ३० टक्के एवढीच रक्कम भरायची असल्याने त्यांचा या अभियानास प्रतिसाद मिळत आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यातील सर्व शेतकऱ्यांना या अभियानाचा लाभ देण्यासाठी मुख्य अभियंता भुजंग खंदारे यांच्या नेतृत्वाखाली नियोजन करण्यात आले असून ठिकठिकाणी आयोजित शेतकरी मेळाव्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
कन्नड विभागात एकाच दिवशी शेतकऱ्यांनी ५३ लाखांची थकबाकी भरली असून तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी वीजबिल थकबाकीतून मुक्त होण्याचा संकल्प केला आहे. महाकृषी ऊर्जा अभियानात कृषिपंपांचे वीजबिल भरून शेतकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी लोकप्रतिनिधींनीही पुढाकार घेतला आहे.
एका क्लिकवर बिलाची माहितीकृषिपंप वीजबिलाची थकित रक्कम व अभियानाच्या माध्यमातून मिळणारी सवलत याबाबत सविस्तर माहिती उपलब्ध करून देण्यासाठी महावितरणने https://billcal.mahadiscom.in/agpolicy2020/app ही लिंक तयार केली आहे. या लिंकवर बारा अंकी ग्राहक क्रमांक नमूद करून एकूण थकबाकी, सवलतीची रक्कम व भरणा करावयाच्या रकमेचा तपशील मिळवता येतो व वीजबिलाबाबत शंका असल्यास तक्रारही करता येते.
६६ टक्के रक्कम विद्युत विकासासाठी वापरणारया अभियानात कृषिपंपधारकांकडून वसूल होणाऱ्या वीजबिलाच्या एकूण रकमेपैकी ३३ टक्के रक्कम ग्रामपंचायत क्षेत्रात तर ३३ टक्के रक्कम जिल्हास्तरीय क्षेत्रात नवीन उपकेंद्र, वाहिन्यांसह विद्युत यंत्रणेच्या सक्षमीकरण तसेच विस्तारीकरणासाठी वापरण्यात येणार आहे. महावितरणही कृषीपंपधारकांना सुरळीत व दर्जेदार सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहे.
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक