Take a fresh look at your lifestyle.

अहमदनगरची सुंदर गावे जाहीर; खाडांबे, वाळवणे, गणोरे, आव्हाने, निमगाव व खडकेवाकेसह ‘त्यां’चाही समावेश

अहमदनगर :

Advertisement

जिल्हा परिषदेच्या वतीने आर. आर. (आबा) पाटील सुंदरगाव पुरस्कार वितरण मंगळवारी (१६ फेब्रुवारी) शहरातील माऊली संकुल सभागृहात सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. त्यासाठी निवड झालेल्या ग्रामपंचायतीची यादी जाहीर करण्यात आलेली आहे.

Advertisement

जिल्हास्तरीय पुरस्कार जाहीर झालेली गावे अशी :

Advertisement

प्रथम पुरस्कार

Advertisement

(वर्ष २०१८-१९) : खाडांबे खुर्द (राहुरी) व वाळवणे (पारनेर) यांना विभागून

Advertisement

(वर्ष २०१९-२०) : गणोरे (अकोले) व आव्हाने बुद्रुक (शेवगाव) यांना विभागून

Advertisement

वर्ष २०२०-२१) : निमगाव बुद्रुक (संगमनेर) व खडकेवाके (राहता) यांना विभागून

Advertisement

तालुकास्तरीय पुरस्कार (वर्ष २०२०-२१) :

Advertisement
तालुकाग्रामपंचायत
अकोलेडोंगरगाव
संगमनेरनिमगाव बुद्रुक
कोपरगावकरंजी
श्रीरामपूरजाफराबाद व मुठे वडगाव (विभागून)
राहताखडकेवाके
राहुरीसडे
नेवासावडाळा बहिरोबा
शेवगावराक्षी
पाथर्डीचिचोंडी
जामखेडखर्डा
कर्जतकोपर्डी व कानगुडवाडी (विभागून)
श्रीगोंदामढेवडगाव
पारनेरजामगाव
नगरटाकळी खातगाव

या कार्यक्रमासाठी पालकमंत्री हसन मुश्रीफ उपस्थित राहणार आहेत. या पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, मृदा व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख व राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष राजश्री घुले यांनी दिली आहे.

यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, खासदार डॉ. सुजय विखे, खासदार सदाशिव लोखंडे, आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार अरुण जगताप, आमदार किशोर दराडे, आमदार राधाकृष्ण विखे, आमदार बबनराव पाचपुते, आमदार मोनिका राजळे, आमदार संग्राम जगताप, आमदार लहू कानडे, आमदार आशुतोष काळे, आमदार रोहित पवार, आमदार डॉ. किरण लहामटे व आमदार नीलेश लंके, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रताप शेळके, अर्थ व पशुसंवर्धन समितीचे सभापती सुनील गडाख, बांधकाम समितीचे सभापती काशीनाथ दाते, महिला बालकल्याण समितीच्या सभापती मीरा शेटे, समाजकल्याण समितीचे सभापती उमेश परहर उपस्थित राहणार आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply