दिल्ली :
आंतरराष्ट्रीय पर्यावरण कार्यकर्ता ग्रेटा थनबर्ग हिने ट्विटरवर शेतकरी आंदोलनाशी संबंधित लिहिल्यानंतर जगभरात शेतकरी आंदोलन जोरदार चर्चेत आलेले होते. त्याच्या टूलकिट प्रकरणात दिल्ली पोलिसांनी कारवाई करताना पहिली अटक केली आहे. दिशा रवी असे अटक झालेल्या तरुणीचे नाव असून ती बंगलोरची रहिवासी आहे.
२१ वर्षीय दिशा रवी ही मूळची बंगलोरची रहिवासी आहे. ती पर्यावरण चळवळीतील एक तरुण कार्यकर्ती असून, ‘फ्रायडेज फॉर फ्युचर’ या संघटनेच्या संस्थापक सदस्यांपैकी एक आहे. ती माऊंट कार्मेल या प्रतिष्ठित महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून तिने हे टूलकिट एडिट करून प्रसारित केल्याचा संशय आहे.
३ फेब्रुवारी रोजी पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा हिने शेतकरी आंदोलन विषयी ट्विट केले असून नंतर चुकून तिने हे टूलकिट आपल्या ट्विटरवर टाकले होते. नंतर हे टूलकिट डिलीट करण्यात आले असले तरीही या टूलकिट मधल्या अनेक आक्षेपार्ह गोष्टी लक्षात घेऊनच या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. या टूलकिट प्रकरणाच्या तपासात गूगल दिल्ली पोलिसांचे सहकार्य करणार आहे.
ग्रेटा थनबर्ग हिने ट्विटरवर अनवधानाने शेअर केलेल्या टूलकिटवरून दिल्ली पोलिसांनी ४ फेब्रुवारी रोजी गुन्हा दाखल केला होता. याच प्रकरणात आता अटकसत्र सुरु झाले असून दिशा रवी या पहिल्या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. २६ जानेवारी रोजी दिल्ली येथे झालेल्या हिंसाचाराचा आणि या टूलकिटचा संबंध असण्याची शक्यता आहे.
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार उचलणार ‘ते’ पाऊल; बघा, नेमकं काय म्हणालेत अशोक चव्हाण
- कोलकाताच्या ‘या’ दुकानात 1 चहा मिळतोय हजार रुपयाला; जाणून घ्या काय आहे या चहाची खासियत
- अर्थसंकल्पानंतर ‘या’ शेअर्सने भरले गुंतवणुकदारांचे खिसे; एका महिन्यात दिला तब्बल 150% परतावा
- रॉम्पस+ ईव्ही स्कूटर या पॉवरफुल सायकलबद्दल आहे का तुम्हाला ‘ही’ माहिती; वाचा की मग महत्वाची माहिती
- म्हणून ‘त्यावेळी’ तपासली होती युवराजची बॅट; पहा कोणी आणि का केले होते असे कृत्य