Take a fresh look at your lifestyle.

ट्रेंडिंग : चंद्रकांत दादांचे मन भरून आले.. पण ‘त्यांनी’ केली प्रश्नांची सरबत्तीही..!

पुणे :

Advertisement

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील एक यांनी एक खास आणि भावनिकदृष्ट्या साद घालणारा फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. त्यांनी राम मंदिराला गरीब कसे देणगी देत आहेत याचा व्हिडिओ शेअर केला होता. मात्र, त्यानंतर अनेकांनी त्यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती केली आहे.

Advertisement

दादांनी व्हिडिओ टाकून लिहिले आहे की, जळगांव मधील रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे अतिशय कष्टाच्या परिस्थितीत जगणाऱ्या कोष्टी दाम्पत्याने राम मंदिर निर्माणासाठी निधीसमर्पण केला. दातृत्वाचा हा भाव केवळ हिंदु धर्मातच बघायला मिळतो. जय श्रीराम..

Advertisement

त्यावर श्रीधर पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे की, सरकार राममंदिर बांधणार आहे. त्यासाठी गरिबांच्याकडुन का अपेक्षा करता? मागायला जाणाऱ्या लोकांनाही लाज कशी वाटली नाही? श्रीमंतांना मागा की देणगी.

Advertisement

Chandrakant Patil on Twitter: “जळगांव मधील रावेर तालुक्यातील कुंभारखेडा येथे अतिशय कष्टाच्या परिस्थितीत जगणाऱ्या कोष्टी दाम्पत्याने राम मंदिर निर्माणासाठी निधीसमर्पण केला. दातृत्वाचा हा भाव केवळ हिंदु धर्मातच बघायला मिळतो. जय श्रीराम @ChampatRaiVHP https://t.co/qGfMUhwNUr” / Twitter

Advertisement

अविनाश माळशिकरे यांनी लिहिलेय की, आश्या गरीब लोकांकडून वर्गणी मगण्यापेक्ष्या, धन धांडगे श्रीमंत राजकारणी खेळाडू यांच्याकडून 10 पटीने घेतले तरी काय वाटायचे नाही..

Advertisement

डॉ. निकिता यांनी म्हटलेय की, त्यांचा घराचं पण बघा , थोडी दया करा त्यांच्यावर.. खर तर मला आनंद आणि दुःख हृदयात वेदना होत आहे, उर भरून आलंय, आपण ह्या लोकांना मदत करू शकत नाहीत का? काहीतरी करायला हवं यांच्यासाठी, इतकं निर्दयी सुद्धा नसावे, वेदनादायी आहे हे सर्व, असेही म्हटले आहे.

Advertisement

तर, अनेकांनी याचे कौतुक केले आहे. अजिंक्य जाधव यांनी लिहिले आहे की, या आजोबांचा धर्म कार्य पाहून खूप ऊर भरून आला भगवान श्रीराम करो यांना उदंड आयुष्य लाभो हीच श्री रामा चरणी प्रार्थना सलाम तुमच्या कार्याला..

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply