Take a fresh look at your lifestyle.

हवामान वृत्त : राज्याच्या ‘त्या’ भागात होणार गडगडाटी पाऊस; पहा वेदर अपडेट

पुणे :

Advertisement

महाराष्ट्र राज्यावर पुन्हा एकदा अवकाळी पावसाचे संकट येणार आहे. रबी पिकांच्या काढणीमध्ये व्यत्यय येण्यासह फळबागांना यामुळे झटका बसण्याची शक्यता आहे.

Advertisement

भारतीय हवामान विभागाच्या पुणे वेधशाळेने हवामान अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार राज्यातील कोकण आणि गोवा राज्य वगळता इतर सगळीकडे अनेक भागात पावसाची शक्यता आहे. मध्य महाराष्ट्रात मेघगर्जनेसह विजेच्या कडकडाटात पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

तर, मराठवाडा भागात आणि विदर्भाच्या भागातही असाच पाउस होण्याचा अंदाज आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्र आणि लगतच्या भागात चक्रवती वारे कायम आहेत. तसेच केरळ आणि कर्नाटक समुद्र किनाऱ्याच्या भागातही कमी दाबाचा पट्टा कायम आहे.

Advertisement

त्यामुळेच राज्यात पुन्हा एकदा अवकाळी पावसाची शक्यता आहे. 16 ते 18 फेब्रुवारी दरम्यान अशा पद्धतीने राज्याच्या अनेक भागात तुरळक किंवा गडगडाटी पाऊस होण्याचा अंदाज आहे.

Advertisement

शेतकऱ्यांनी आपल्या उत्पादित शेतमालाला सुरक्षित स्थळी न्यावे. तसेच नुकसान कमी करण्यासाठी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply