Take a fresh look at your lifestyle.

‘त्या’ क्षेत्रातही भारत झाला आत्मनिर्भर; पहा मोदी सरकारने केलीय ‘ही’ कमाल

दिल्ली :

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात अनेक क्षेत्रात सकारात्मक व नकारात्मक बदल झाल्याचे दिसते. त्याबाबत उलटसुलट चर्चाही चालू असते. याच मोदीजींच्या सहा वर्षांच्या कार्यकाळातील कामामुळे देश डाळ उत्पादनात आत्मनिर्भर होण्याच्या मार्गावर आहे.

Advertisement

कृषिमंत्री नरेंद्रसिंग तोमर यांनी जागतिक डाळी दिनी रोममधील आंतरराष्ट्रीय परिषदेत बोलताना सांगितले की, जागतिक स्तरावर डाळींचे उत्पादन करणारा आणि ग्राहक म्हणून एक मोठा देश आहे. भारत हा डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्ण झाला आहे.

Advertisement

तोमर म्हणाले की, प्रथिनयुक्त डाळी हे भारतातील अन्न उत्पादनातील महत्त्वाचे पीक आहे. मागणी व पुरवठ्यातील तूट कमी करण्यासाठी डाळीचे उत्पादन वाढविण्यावर मोदी सरकार भर देत आहे. मागील सहा वर्षांत डाळींच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यासाठी सरकार काम करीत आहे. त्यातून सरकारने वर्षाकाठी 15,000 रुपये वाचवण्यास सुरुवातही केली आहे.

Advertisement

कृषीमंत्री म्हणाले की, देशात गहू आणि धान खरेदी किमान आधारभूत किंमतीत (एमएसपी) चालू होती. मात्र, डाळी व तेलबिया खरेदीसाठी कोणतीही व्यवस्था नव्हती, केंद्र सरकारनेही आता कादाध्याने आणि तेलबिया यांची एमएसपीच्या आधारावर खरेदी करून शेतकर्‍यांना व्यवस्था केली आहे.

Advertisement

ते म्हणाले की, सहा वर्षांत डाळींचा एमएसपी 40 टक्क्यांवरून 73 टक्क्यांपर्यंत वाढविण्यात आला आहे, त्याचा फायदा निश्चितच शेतकऱ्यांना देण्यात येत आहे. कुपोषण दूर करण्यासाठी डाळीचे उत्पादन आणखी वाढवण्याची आवश्यकता आहे. संपादन : माधुरी सचिन चोभे  

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply