पुणे :
व्हॅलेन्टाइन डे अर्थात जगभरातील प्रेमाचा दिवस. या दिवसाबद्दल संस्कृतीच्या रक्षकांना काही समस्या असतीलही, मात्र जगभरातील तरुणाई आणि प्रेमाचे महत्व समजणाऱ्या सर्वांचा हा सण. याच सणावर यंदा करोना विषाणूचे संकट आहे.
लेन्टाइन डेवर यंदा कोरोनाचे सावट असताना गुलाबफुलांच्या रंगछटा मात्र गडद झाल्या आहेत. या काळात भारतातून होणारी फुलांची निर्यात घटल्याने ही फुले स्वस्त झाली आहेत. त्यामुळे उत्पादक शेतकऱ्यांना याचा फटका सहन करावा लागत आहे.
पुणे, मावळ, शिरूर, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर येथील गुलाबाची मागणी गुजरातेत बडोदा, सूरत, मध्य प्रदेशमध्ये इंदूर, हैदराबाद, दिल्ली तसेच नागपूर येथून अधिक असते. मात्र, यंदा परदेशात निर्यात झालेली नसल्याने भारतीय बाजारात फुलाचे भाव फिके पडले आहेत.
गुलाबांची सर्वाधिक मागणी युरोपीय देशांकडून असते. पण कोरोनाची दुसरी लाट युरोपीय देशांत सुरू झाल्याने कडक लाॅकडाऊन सुरू आहे. आंतरराष्ट्रीय उड्डाणे बंद आहेत. त्यामुळे निर्यात न झालेला गुलाबफुलांचा स्टाॅक स्थानिक बाजारपेठेत उपलब्ध झाला आहे. परिणामी गुलाबाच्या किमतीत घट झाली आहे.
पुणे जिल्हा फूल उत्पादक संघाचे अध्यक्ष शिवाजीराव भेगडे म्हणाले, गेल्या वर्षी सुमारे सव्वा ते दीड कोटींची निर्यात झाली होती. यंदा ती पूर्ण घटली आहे. तेव्हा फुलाला १२ रुपये दर मिळाला होता, तो आता ४ रुपयांवर आला आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!