पुणे :
अवघ्या महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात सध्या पुणे येथील पूजा चव्हाण या तरुणीच्या आत्महत्याचे प्रकरण ट्रेंडमध्ये आहे. तिच्या मृत्यूचे नेमके कारण आता स्पष्ट झाले आहे. मात्र, त्याचवेळी त्यातील राजकीय आणि इतर कंगोरे नेमके कुठे आणि कसे जाणार याचीच उत्सुकता वाढत आहे.
मूळची बीड जिल्ह्यातील असलेल्या पूजा चव्हाण या तरुणीने ७ फेब्रुवारी रोजी पुण्यात आत्महत्या केली होती. तिच्या काही ऑडीओ क्लिप व्हायरल होत आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत महाराष्ट्र पोलिसांचे लक्ष वेधले आहे. भाजपाकडून या मंत्र्यांच्या नावाचाही उल्लेख करण्यात आला असून, राज्याचे वनमंत्री संजय राठोड यांचा राजीनामा घेण्याची मागणी भाजपाकडून करण्यात आलेली आहे.
दरम्यान, पूजाच्या गावाकडील घराला कुलूप आहे. तिचे कुटुंबीय कुठे आहेत हेही समजू शकलेले नाही. तसेच क्लिप व्हायरल करणारा तरुणही गायब आहे. पूजा चव्हाण या तरुणीचा मृत्यू डोक्याला मार लागून झाल्याचा पोस्टमार्टम रिपोर्टमध्ये उल्लेख असल्याचं वरिष्ठ पोलीस निरीक्षक दीपक लगड यांनी पोलीस महासंचालकहेमंत नगराळे यांना सांगितलं आहे. याप्रकरणी सखोल चौकशी करण्याचे आदेशही त्यांनी दिले आहेत.
भाजप बंजारा युवती आघाडीची कार्यकर्ता पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येनंतर तिचे परळी शहरातील घर बंद आहे. तर, आई-वडील संपर्काबाहेर आहेत. या घटनेतील ऑडिओ क्लिप माध्यमात आणणारा राठोड नावाचा तरुणही गायब असल्याने या प्रकरणाचे गूढ आणखी वाढले आहे.
दरम्यान, शनिवारी राष्ट्रीय महिला अायाेगाने याची दखल घेतली. राज्याचे पोलिस महासंचालक अाणि पूणे पूर्व विभाग पोलिस अायुक्तांना याप्रकरणी बारकाईने तपास करण्याची मागणी अायोगाच्या अध्यक्षा रेखा शर्मा यांनी केली अाहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : तूर 7,200 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6600 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : कांद्याचे भाव घसरले; वाचा संपूर्ण राज्यातील मार्केट रेट
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक