Take a fresh look at your lifestyle.

व्होडाफोन आयडियाला झटका; ‘आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना’ अशी झाली गत

दिल्ली :

Advertisement

आधीच मोठी कर्जबाजारी असणारी कंपनी वोडाफोन आयडियाला अजून एक मोठा झटका बसला आहे. आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना अशी गत कंपनीची झाली आहे.

Advertisement

चालू आर्थिक वर्षात 2020-21 च्या तिसर्‍या तिमाहीत टेलीकॉम कंपनी वोडाफोन आयडियाला 4532.१ कोटी रुपयांचे कंसॉलिडेटेड तोटा झाला. मागील आर्थिक वर्षाच्या तुलनेत टेलिकॉम कंपनीचा निव्वळ तोटा कमी झाला आहे.

Advertisement

गेल्या आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर-डिसेंबर 2019 च्या तिसर्‍या तिमाहीत व्होडाफोन आयडियाचे 6438.8 कोटी रुपयांचे नुकसान झाले. ऑक्टोबरच्या तुलनेत ऑपरेशंसमधून येणारा महसूल 1.7 टक्क्यांनी घटला.

Advertisement

शेयर मार्केटमध्ये देशातील तिसर्‍या क्रमांकाची कंपनी व्होडाफोन आयडिया लिमिटेड (व्ही) चे चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत 7218 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे. 4 जी वायरलेस ग्राहकांची वाढ, किंमत ऑप्टिमायझेशन आणि सेवा गुणवत्तेत सुधारणा यामुळे कंपनीचा निव्वळ तोटा कमी झाला.

Advertisement

चालू आर्थिक वर्षाच्या ऑक्टोबर ते डिसेंबर २०२० च्या तिसर्‍या तिमाहीत महसूल घटला आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर तिमाहीत महसूल 1.7 टक्क्यांनी कमी झाला आणि या घटीनंतर महसूल 10894 कोटी रुपये झाला.

Advertisement

चालू आर्थिक वर्षाच्या दुसर्‍या तिमाहीत कंपनीचा एआरपीयू 119 रुपये होता, जो तिसर्‍या तिमाहीत वाढून 121 रुपये झाला. डिसेंबर 2020 च्या तिमाहीत कंपनीचा EBITDA 4286 कोटी रुपयांवर गेला. जो डिसेंबर 2019 च्या तिमाहीत 3421 कोटी रुपये होता.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply