पुणे, मुंबईनंतर ‘या’ शहरातही होणार शंभर एकरात आयटी पार्क; उद्योगमंत्र्यांची मोठी घोषणा
कोल्हापूर :
उद्योगनगरी असणार्या कोल्हापूरसाठी महाविकास आघाडी सरकारने मोठी घोषणा केली आहे. पुणे आणि मुंबईच्या धर्तीवर कोल्हापुरात शंभर एकर जागेत आयटी पार्क उभा करणार असल्याची घोषणा उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी कोल्हापुरात केली.
ते म्हणाले की, शाहू महाराजांनी कोल्हापूरला उद्योगनगरी म्हणून ओळख दिली. ही ओळख कायम ठेवतानाच उद्योगाचा हा वारसा पुढे कायम ठेवण्यासाठी सरकार प्रयत्न करेल. त्याचाच एक भाग म्हणून कोल्हापुरात आयटी पार्क उभारण्यात येणार आहे.
यावेळी ते कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील अन्नपूर्णा साखर आणि गूळ प्रकल्पाच्या उद्घाटन समारंभात बोलत होते.
पुढे बोलताना ते म्हणाले की, हिंजवडीप्रमाणे कोल्हापुरात शंभर एकर जागेवर हे आयटी पार्क उभारण्यात येईल. यासाठी मुंबईसह राज्यभरातील अनेक उद्योजकांना आमंत्रित करण्यात येईल. त्यांना तत्काळ जमिन व सुविधा देण्यात येतील.
कोल्हापुरातील स्थानिक उद्योजकांशी चर्चा करून जागा निश्चित करण्यात येईल. कोल्हापुरात जो माल तयार होतो, त्याचा दर्जा अतिशय चांगला असतो. त्यामुळे त्याला परदेशातूनही मागणी असते. याचाच फायदा येथील उद्योगांना होईल.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- निवडणुकांचा बिगुल वाजला; ‘या’ 5 राज्यांच्या होणार निवडणुका; वाचा, संपूर्ण वेळापत्रक
- नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये बनले आहेत ‘हे’ 9 यादगार विक्रम; जे नेहमीच प्रत्येकाच्या लक्षात राहतील
- एका दिवसात 6 लाख कोटींचा फटका; वाचा, नेमकं कशामुळे झालंय ‘एवढं’ नुकसान
- मुकेश अंबानींच्या बंगल्याबाहेर कार प्रकरणाचा पहिला पुरावा हाती; वाचा, पोलिसांनी नेमकं काय शोधलय
- सोन्याच्या भावात मोठी घसरण; वाचा, काय आहेत ताजे दर