पुणे :
सध्या कधी ढगाळ तर कधी कडाक्याची थंडी असे वातावरण आहे. या वातावरणाचा फटका द्राक्षसारख्या पिकाला आधीच बसला आहे. अशातच आता पुन्हा एकदा राज्यभरात अवकाळी पावसाची शक्यता सांगितली गेली आहे.
आधीच बदलत्या वातावरणामुळे अडचणीत आलेल्या शेतकर्यांसाठी ही महत्वाची बातमी आहे. शेतकरी आणि फळ बागायतदारांना हा अवकाळी पाऊस कदाचित मोठ्या अडचणीत आणू शकतो. हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या महितीनुसार, महाराष्ट्रासह देशात 16 ते 20 फेब्रुवारीदरम्यान पाऊस पडेल.
१६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान दुपारनंतर राज्याच्या काही भागात वादळी पाऊस कोसळण्याची शक्यता असून विदर्भातील भंडारा, गोंदिय, गडचिरोली, नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा आणि अमरावती या जिल्ह्यांमध्ये पावसाची शक्यता आहे.
१८ तारखेला मात्र खान्देशसह नगर, नाशिक आणि पुण्याला पावसाचा अंदाज आहे. काही ठिकाणी गारपीटही होऊ शकते. काही भागात १९ फेब्रुवारीपर्यंत ढगाळ वातावरण राहण्याचा अंदाज आहे.
१७ तारखेला विदर्भासह मराठवाड्यात वादळी पावसाची शक्यता आहे तर १८ तारखेला विदर्भात तसेच मराठवाड्यात पावसाचा प्रभाव कमी होईल. २० तारखेपासून पुन्हा पूर्ववत होईल, अशी शक्यता आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- ‘त्या’ शिक्षक, कर्मचाऱ्यांना खुशखबर; वेतन आयोगाबाबत सरकारने केली मोठी घोषणा
- पुन्हा मिळणार नाही सोने खरेदीची ही संधी; सलग आठव्या दिवशी सोन्याच्या दरात ‘एवढी’ घसरण, वाचा ताजे भाव
- देशात पहिल्यांदाच सुरू झालीय गाढवाच्या दुधाची डेअरी; दूध विकले जातेय ‘एवढ्या’ किमतीला; वाचा, भन्नाट स्टोरी
- दूध पिताना ‘या’ नक्कीच गोष्टी ठेवा लक्षात; अन्यथा…
- घर खरेदी करण्यासाठी सुवर्णसंधी : ‘या’ 2 बँकांनी दिलीय गुड न्यूज