Take a fresh look at your lifestyle.

वाईट बातमी : प्रमाणात घट; मात्र, तरीही तब्बल 170 शेतकऱ्यांनी गमावला जीव..!

नागपूर :

Advertisement

विदर्भ म्हणजे शेतकऱ्यांचे मृत्युस्थळ असेच म्हणण्याची वेळ आलेली आहे. दुर्दैवाने ही चर्चा खरी ठरल्याचे आणखी एका प्रकरणाने समोर आलेले आहे. शेतकरी आत्महत्येसाठी चर्चेत असलेला हा भाग आता कीटकनाशक वापर आणि त्याद्वारे होणाऱ्या मृत्यूचे केंद्रही बनला आहे.

Advertisement

या भागातील फ़क़्त यवतमाळ आणि अकोला या दोन जिल्ह्यात वर्षभरात कीटकनाशक विषबाधा प्रकरणातून तब्बल 170 जणांनी आपला जीव गमावला आहे. म्हणजेच तितके कुटुंब उघड्यावर पडले आहेत. तरीही हे सत्र थांबण्याची चिन्हे नाही.

Advertisement

मागील वर्षीच्या तुलनेत यंदा काहीअंशी यात आकडे कमीही झालेले आहेत. मात्र, काहीजणांचे आकडे पुढेच आलेले नसतील अशीही शंका आहे. 168 जणांना रुग्णालयात उपचार घेऊन सोडण्यात असल्याचाही अहवाल आहे. एकूणच हे दुर्दैवाचे चक्रव्यूह विदर्भाला अजूनही भेदता आलेले नाही.

Advertisement

तीन वर्षांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यात कीटकनाशकांचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचा मृत्यू झाला हाेता. त्यानंतर हेच लाेण अकाेला जिल्ह्यातही पसरले हाेते. परिणामी कीटकनाशक फवारणीबाबत शासनासह सर्वच यंत्रणांकडून जनजागृती करण्यात येत आहे. मात्र, त्याला अजूनही म्हणावे तसे यश आलेले नाही.

Advertisement

नुकतेच विषबाधा झाल्याची शंका अाल्यानंतर दाेघांना रुग्णालयात भरती केले. उपचारादरम्यान त्यांना मृत्यू झाला. मात्र या दाेघांचाही व्हिसेरा अहवाल अद्याप प्राप्त झालेला नाही. त्यामुळे अहवालानंतरच मृत्यूचे कारण स्पष्ट हाेणार असल्याचे कृषी विभागाचे म्हणणे अाहे.

Advertisement

अशा पद्धतीने सरकारी यंत्रणा अजूनही याद्वारे कर्तव्यदक्ष झालेली नाही. आरोग्य विभाग नावाची सुस्तावलेली यंत्रणा ढिम्म आहे. तर, महाराष्ट्र शासनाला याचे काहीही पडलेले नसल्याने आणखी किती शेतकऱ्यांचे मृत्यू याद्वारे होणार, हाच दुर्दैवी प्रश्न शेतीच्या अभ्यासकांना सतावत आहे.

Advertisement

संपादन : सचिन पाटील

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply