Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून एसपींनी माफ केला तरुणाचा 5 हजारांचा दंड; दाखवला वेगळाच दृष्टिकोन

दिल्ली :

Advertisement

पोलिस अधिकारी किंवा कर्मचारी यांच्याबद्दल आपल्याकडे एक गृहीतक पक्के आहे. ते म्हणजे पोलीस कोणताही असो, तो निर्दयी असतो आणि त्यांच्याकडे ‘चुकी’ला माफी नाही. मात्र, चूक कबुल करणाऱ्या नागरिकांनाही पोलीस मग माफ करतात किंवा त्यांच्या कचाट्यातून सोडतात असेही नाही. मात्र, उत्तरप्रदेशात इटवाह येथील एसपी (एसएसपी) साहेबांनी मात्र एक वेगळाच प्रकार केला आहे.

Advertisement

हरिपूर येथील दिपेंद्र यादव या तरुणाच्या बाबतीत ही घटना घडली आहे. त्याला गाडीचा नंबर प्लेटवरील एक नंबर तुटून पडल्याने 5 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला होता. पोलिसांनी याची पावती फाडली होती. मात्र, मग दिपेंद्र याने थेट एसपी आकाश तोमर यांना ही घटना ट्विट करून सांगितली. चूक / गुन्हा कबूल करतानाच इतका मोठा दंड भरण्याची कुवत नसल्याचे त्याने प्रामाणिकपणे कबुल केले.

Advertisement

अखेर एसपी साहेबांनी त्याची ही आर्त हाक ऐकून त्याचा दंड न भरण्यासाठी तो रद्द करण्याची कार्यवाही केली. मानवतावादी दृष्टीकोन ठेऊन तोमर साहेबांनी केलेली ही मदत अनेकांना आवडली आहे.

Advertisement

दिपेंद्रने म्हटले होते की, त्यावर एसपी तोमर यांनी तुझे चलन रद्द झाले असून शुभेच्छा असे प्रत्युत्तरादाखल ट्विटरवर लिहिले आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply