Take a fresh look at your lifestyle.

‘टाटां’च्या कारवर मिळतेय 70 हजारांपर्यंत सूट; पहा कुठे अन कशी मिळतेय ऑफर

मुंबई :

Advertisement

देशी कार उत्पादनात आघाडीवर असलेल्या टाटा मोटर्स कंपनीची कार खरेदी करण्यासाठी चालू महिन्यात तब्बल 70 हजार रुपयांपर्यंत दमदार सूट मिळत आहे.

Advertisement

कंपनी या महिन्यात बर्‍याच मोटारींवर भारी सवलत देत आहे. ग्राहक त्यामुळे 70,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. कंपनीकडून सवलतीच्या दरात मिळणाऱ्या कारमध्ये नेक्सन, टिगोर, टियागो आणि हॅरियरचा समावेश आहे. या ऑफर मर्यादित काळासाठी आहेत.

Advertisement

या व्यतिरिक्त वेगवेगळ्या राज्ये आणि डिलरशिपमध्ये या ऑफर बदलल्या जाऊ शकतात. चला तर मग पाहूया आपण कंपनी कोणत्या कारवर कशा पद्धतीने विशेष सूट देत आहे.

Advertisement

या महिन्यात टाटाच्या टियागो कारवर एकूण 28,000 रुपयांची सूट मिळत आहे. कंपनी आपल्या एंट्री लेव्हल कारवर 15,000 रुपयांची कॅश सूट आणि 10,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस देत आहे. त्याचवेळी कॉर्पोरेट कर्मचारी या कारवर 3,000 रुपयांपर्यंत आणखी बचत करू शकतात.

Advertisement
Source : Google

टिगोर खरेदी करून ग्राहक एकूण 33,000 रुपयांपर्यंत बचत करू शकतात. या महिन्यात टाटा मोटर्स आपल्या टिगोरवर 15 हजार रुपये रोख सवलत आणि 15 हजार रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस देत आहे. याशिवाय कंपनीकडून 3,000 रुपयांचा कॉर्पोरेट बोनसही देण्यात येत आहे.

Advertisement

तर, हॅरियरच्या कॅमो, डार्क एडिशन, एक्सझेड + आणि एक्सझेडए + व्हेरिएंट्स व्यतिरिक्त सर्व मॉडेल्सवर एकूण तब्बल 70,000 रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यामध्ये 25,000 रुपयांची रोकड सूट, 40,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि कॉर्पोरेट बोनस 5000 रुपये याचा समावेश आहे.

Advertisement

यासह हॅरियरच्या कॅमो, डार्क एडिशन, एक्सझेड + आणि एक्सझेडए + व्हेरिएंट यावरही एकूण 45 हजार रुपयांची सूट उपलब्ध आहे. यामध्ये 40,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट बोनसचा समावेश आहे.

Advertisement

अखेर नेक्सनच्या डिझेल मॉडेलवर एकूण 20 हजार रुपयांपर्यंतची सवलत उपलब्ध आहे. यामध्ये 15,000 रुपयांपर्यंतचे एक्सचेंज बोनस आणि 5 हजार रुपयांच्या कॉर्पोरेट बोनसचा समावेश आहे.

Advertisement

नेक्सनच्या पेट्रोल मॉडेलवर फ़क़्त 3 हजार० रुपयांपर्यंत सूट मिळत आहे. यात केवळ 3,000 रुपयांच्या कॉर्पोरेट बोनसचा समावेश आहे.

Advertisement

यासह नेक्सनच्या इलेक्ट्रिक मॉडेलवर एकूण 15,000 रुपयांपर्यंतची सवलत उपलब्ध आहे. यात केवळ 15,000 रुपयांच्या एक्सचेंज बोनसचा समावेश आहे.

Advertisement

संपादन : माधुरी सचिन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply