Take a fresh look at your lifestyle.

सोन्याचे दर कोसळले, चांदीही 68 हजारांच्या खाली; वाचा, काय आहेत ताजे दर

दिल्ली :

Advertisement

जागतिक स्तरावर सोन्याच्या घसरणीचा परिणाम दिल्ली सराफा बाजारातही दिसून आला. याशिवाय रुपयाच्या मजबुतीमुळे सोन्यानेही कमकुवतपणा दाखवला. शुक्रवारी, 12 फेब्रुवारी रोजी राजधानी दिल्लीत सोन्याच्या किंमतीत 661 रुपयांची घसरण झाली. त्या घसरणीनंतर दिल्ली सराफा बाजारात शुक्रवारी, 12 फेब्रुवारीला सोन्याचे दर दहा ग्रॅम 46847 रुपयांवर गेले.

Advertisement

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक (कमोडिटीज) तपन पटेल यांनी ही माहिती दिली. एका दिवसापूर्वी सोन्याच्या किंमती प्रति दहा ग्रॅम 47508 रुपयांवर बंद झाल्या. त्याशिवाय दिल्ली सराफा बाजारात आज घसरण झाल्यामुळे चांदीचा दर प्रतिकिलो 68 हजारच्या खाली आला.

Advertisement

शुक्रवारी 12 फेब्रुवारी रोजी दिल्ली सराफा बाजारात सोन्याचे भाव तर कमी झालेच तसेच चांदीचीही घसरण झाली. चांदीचे दर 68 हजार रुपयांच्या खाली गेले. राजधानी दिल्लीत आज चांदीच्या भावात प्रति किलो 347 रुपयांची घसरण झाली आहे. या घसरणीनंतर दिल्ली सराफा बाजारात चांदीचा दर प्रति किलो 67894 रुपये होता. दिवसभरापूर्वी चांदीचा भाव  68241 रुपयांवर बंद झाला होता.

Advertisement

आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे भाव घसरले. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर 1815 अमेरिकी डॉलर (131737.15 रुपये) प्रति औंस (1 किग्रा= 35.3 औंस) होते. चांदीची किंमत जवळजवळ स्थिर आहे.

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply