मुंबई :
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण 2021-22 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प काही दिवसांपूर्वी सादर केला होता. या अर्थसंकल्पात केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील कस्टम ड्यूटीत कमी केली असल्याचे सांगितले. याचाच थेट परिणाम सोन्याच्या आणि चांदीच्या दरावर झाला.
गेल्या आठवडाभरात सोने जवळपास अडीच हजारांनी कमी झाले. मधल्या काळात एकदा सोन्याच्या दरात एकदा हलकीशी तेजी आली होती. मात्र आता पुन्हा एकदा सोन्याच्या दरात घसरण झाल्याचे समोर आले आहे. .
काल सोन्याचे दर जवळपास 600 रुपयांनी घसरले होते. तर आज सोन्याचे दर अवघ्या 10 रुपयांनी कमी झाले. आज सलग तिसर्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे.
सोन्याच्या दरात सतत होत असलेल्या घसरणी मुळे सोने खरेदीसाठी मागणी वाढली आहे. कोरोना काळात सोन्याचे दर गगनाला भिडले होते.
आज राजधानी दिल्लीत 10 ग्राम 22 कॅरेट सोन्यासाठी 46 हजार 390 रूपये मोजावे लागत आहेत. तर 10 ग्राम 24 कॅरेट सोन्यासाठी 50 हजार 610 रूपये मोजावे लागत आहेत.
काही दिवसांपासून सोन्याच्या दरात सतत घसरण होत असल्यामुळे ग्राहकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. अजूनही दर कमी होण्याची शक्यता असल्याचे तज्ञांनी संगितले आहे.
संपादन : स्वप्नील पवार
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649
ईमेल : krushirang@gmail.com
- बाजारभाव अपडेट : कांद्याच्या भावात घसरण; वाचा, राज्यात कुठे, किती मिळतोय दर
- मार्केट अपडेट : ज्वारीच्या भावात घसरण; वाचा, राज्यातील मार्केट रेट
- बाजारभाव अपडेट : हरभरा 6400 वर; वाचा संपूर्ण राज्यात कुठे, किती मिळतोय भाव
- बाजारभाव अपडेट : तूर 7,300 च्या पार; वाचा, संपूर्ण महाराष्ट्रातील बाजारभाव
- बाजारभाव अपडेट : पुण्यात द्राक्षाला 9000 भाव; वाचा, संपूर्ण राज्यातील मार्केट रेट