हिंदी सिनेमातील गुणी अभिनेते असलेल्या परेश रावल यांनी नुकतेच शेअर केलेले फोटो आणि त्यातील भावार्थ यांच्यात जनतेची दिशाभूल करण्याचा प्रयत्न असल्याचे स्पष्ट झालेले आहे.
परेश रावल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मदतीचे फोटो शेअर केले होते. इतरांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये उत्तराखंड येथील नुकत्याच झालेल्या दुर्दावी घटनेचा संदर्भ देण्यात आलेला आहे. मात्र, व्हायरल होत असलेले फोटो थेट आठ वर्षे जुने आहेत.
भाजप प्रवक्ते आर पी सिंह यांनी आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. पोस्टमध्ये RSS च्या स्वयंसेवकांचा फोटो आहे. ज्यामध्ये ते पर्वतांवर पोते घेऊन जाताना दिसत आहेत.
पोस्टमध्ये लिहिले आहे की, ‘चमोली तपोवनच्या जवळपास 13 गावांचे अवशेष उरले आहेत, पूल वाहून गेले आहेत. रस्ताही वाहून गेला आहे, अशा वेळी स्वयंसेवक अन्नधान्य खांद्यावर घेऊन जात आहे. जेणेकरुन कुणीही उपाशी झोपणार नाही आणि आजाराने मरणार नाही.’
हा फोटो गूगलवर रिव्हर्स सर्च केला. सर्च रिजल्टमध्ये हा फोटो एका न्यूज वेबसाइटवर बातमीसह सापडला.
बातमीनुसार, हा फोटो उत्तराखंडचा आहे, 2013 मध्ये हा फोटो पब्लिश करण्यात आला होता. 2013 मध्ये उत्तराखंडमध्ये आलेल्या पुरादरम्यान RSS चे स्वयंसेवकांनी अेक ठिकाणी कँप लावून पर्यटक आणि स्थानिक लोकांची मदत केली होती, असे दिव्य मराठी दैनिकाने म्हटलेले आहे.
संपादन : सचिन पाटील
कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com
| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल |
मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com
- प्रवीण दरेकर यांच्या अडचणीत वाढ; ‘त्या’ घोटाळ्याची महाविकास आघाडी सरकार करणार चौकशी
- मुकेश अंबानींचा पुन्हा जगातील श्रीमंतांच्या ‘त्या’ यादीत प्रवेश; पहिल्या 100 श्रीमंतात आहेत ‘हे’ 3 भारतीय
- राकेश झुनझुनवाला आणि त्यांची कंपनी Rare Investmentsने विकले ‘त्या’ कंपनीतील 65 कोटींचे शेअर्स
- इंदिरा गांधींच्या ‘त्या’ वादग्रस्त निर्णयाला राहुल गांधींनीच ठरवले चूक; मात्र सांगितली ‘ती’ही गोष्ट
- बाब्बो.. ठाकरे सरकारचीही कृपा झाली अन ‘जैवविविधता’ताच धोक्यात आली..!