Take a fresh look at your lifestyle.

औरंगाबाद, नगर आणि पुणेकरांसाठी महत्वाची बातमी; ‘त्यामुळे’ आता तुमचा प्रवास होणार सुखाचा

मुंबई :

Advertisement

जेव्हा जेव्हा नगरकर किंवा औरंगाबादकर पुण्याला जातो, तेव्हा तो ठरलेल्या वेळेच्या तासभर का होईना आधीच निघतो. कारण नगर-पुणे रोडवरील ट्रॅफिकजाम हा नित्याचाच झाला आहे. अगदी अध्येमध्ये एखाद्या गावात बाजारदिवस असला तरीही किमान तासाभराचा वेळ ट्रॅफिकजाम मध्येच जातो. मात्र आता औरंगाबाद, नगर आणि पुणेकरांसाठी आनंदाची बातमी आहे.

Advertisement

आता तुम्ही विना ट्रॅफिकजाम या शहरातील अंतर कापू शकणार आहात. केंद्रीय भूपृष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी घोषणा केली की, पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अ‍ॅक्सेस रोड होणार आहे. त्यांनी म्हटले की, पुणे ते औरंगाबाद डायरेक्ट अ‍ॅक्सेस रोड झाल्यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न मार्गी लागणार आहे.

Advertisement

पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, पुणे मुंबई वाहतुकीचा मोठा प्रश्न आहे. त्याचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान, उत्तराखंड, गुजरात या राज्यातून थेट दक्षिणेतील हैदराबाद, बेंगलोर,त्रिवेंद्रम आणि चेन्नई अशा चार दिशांना जाणारी ट्रॅफिक खूप मोठी आहे. त्यामुळे आम्ही मुंबई ते दिल्ली अशा या बारा लेनच्या महामार्गाचं काम सुरु आहे. त्यामुळे मुंबई-दिल्लीपर्यंत अंतर 12-13 तासांत कापता येईल.     

Advertisement

संपादन : स्वप्नील पवार

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649

Advertisement

ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply