Take a fresh look at your lifestyle.

आणि म्हणून कुत्र्यांचा रंग झाला निळाशार; अवघ्या जगाला पडले आश्चर्य

काल्पनिक जगापेक्षा वास्तव खूप आश्चर्यकारक आणि डोक्याला झिणझिण्या आणणारे असू शकते. त्याचाच प्रत्यय रशियात आला आहे. त्यामुळे अवघ्या जगाला आश्चर्याचा झटका बसला आहे.

Advertisement

रशियाच्या जर्सिस्क शहरात रासायनिक प्रदूषणाचा फटका सर्वांनाच चकीत करणारा ठरला आहे. या रासायनिक प्रदूषणामुळे येथील भटक्या कुत्र्यांचा रंग निळा होत आहे. त्याचे फोटो जगभरात व्हायरल होत आहेत.

Advertisement

आतापर्यंत पर्यावरण प्रदूषण व हवामान बदलाचे दुष्परिणामांना नैसर्गिक आपत्तीसह विविध रूपांत दिसून आले आहे. परंतु हा प्रकार अनेकांना पेचात टाकणारा आहे.  केसांचा रंग निळा का झालाय आणि कदाचित या जनावरांना कॉपरसल्फेट रंगाने रंगवलेले असू शकते का, याचाही शोध घेतला जात आहे.

Advertisement

जर्सिस्क शहरात ऑर्गेस्टेकलो कंपनी आर्थिक अडचणींमुळे हा कारखाना बंद पडला होता. या कंपनीत हायड्रोसेनिक अॅसिड व मिथाइल मेथाक्रायलेटचे (प्लेक्सीग्लास) मोठ्या प्रमाणात उत्पादन होत होते. कुत्र्यांचे रंग बदलण्याचे प्रमाण वाढत असल्यामुळे आता अधिकारी तपासासाठी येत आहेत. अधिकाऱ्यांनी कुत्र्यांसह प्रकल्पातील नमुनेही घेतले आहेत.

Advertisement

संपादन : सचिन मोहन चोभे

Advertisement

कृषीरंग | ताज्या बातम्यांसाठी फॉलो करा www.krushirang.com

Advertisement

| डेलीहंट | फेसबुक | जिओ न्यूज एक्स्प्रेस | गुगल न्यूज | AMP | ट्विटर | व्हाट्सऍप | टेलिग्राम | सिग्नल | 

Advertisement

मो. 9503219649 | ईमेल : krushirang@gmail.com

Advertisement

Advertisement

Leave a Reply